आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्याचे दर सहाशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार आणि दक्षिणेकडील राज्यात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात बाजारात येत असल्याने नाशिकच्या कांद्याची मागणी घटली आहे. त्यामुळे दरावरही परिणाम होत असल्याने मंगळवारी लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांदा सरासरी सहाशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे.
नाशिक जिल्ह्यातील उन्हाळ कांद्याची चव ही तिखट आणि कडू असल्याने देशात आणि परदेशात या कांद्याला मोठी मागणी असते. मात्र, सध्या निम्म्या देशात सध्या कांदा बाजारात विक्रीला येत आहे. त्यामुळे नाशिकच्या कांद्याची मागणी घटली आहे. त्यामुळे दरात घसरण होत आहे.

गतवर्षी उन्हाळ कांद्याचे दर हे किरकोळ बाजारामध्ये ७० ते ९० रुपये प्रति किलो गेले होते. त्यामुळे यंदाही तीच परिस्थिती अपेक्षित धरून शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात कांदा साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे कांदा व्यापाऱ्यांनीही बोगस शेतकरी दाखवून साठवणूक केल्याची सध्या शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. ज्यावेळी कांदा दरात वाढ होईल त्यावेळी तो कांदा विक्रीला काढला जाईल. मात्र, सध्या कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. परंतु कांद्याच्या सत्यस्थितीपेक्षा राजकीय पक्ष फायदा घेण्यासाठी अधिक वापर करीत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी सतत निराशा पडत असल्याचे कांदा उत्पादकांनी सांगितले.
हलक्या दर्जाचा कांदा सध्या मोठ्या प्रमाणात विक्रीला येत असून, चांगल्या दर्जाच्या कांदा साठवणुकीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. इम्तियाज पटेल, कांदा व्यापारी
बातम्या आणखी आहेत...