आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदा घसरला, शेतकरी निराश; 300 रुपयांनी दर झाले कमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकर्‍यांची निराश झाली आहे. दर वाढल्यावर शासनातर्फे निर्यांतबंदीचे शस्त्र उपसले जाते, मात्र ज्यावेळी दर कमी होतात, त्यावेळी शासनाने कांदा उत्पादकांसाठी कायमस्वरुपी चांगला निर्णय घेतला जावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात कांदा प्रति क्विंटल 2700 रुपयांवर पोहोचला होता. आता त्यात 300 रुपयांनी घसरण झाली आहे. सध्या दर प्रतिक्विंटल 2451 रुपये आहेत.
जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये गुरुवारी एक हजार ते 2451 रुपये क्विंटल भाव होता. लासलगावमध्ये 1300 ते 2388 रुपये तर कळवणला 2451 रुपयांपर्यंत दर होता. 1 ऑगस्ट पर्यंत हेच भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात पुन्हा कांदा दरात वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कांदा व्यापारी इम्तियाज पटेल यांनी दिली.