आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Online Application Issue At Nashik, Divya Marathi

ऑनलाइन अर्जांमध्येही मराठी भाषेचे वावडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सरकारी कामकाज व नोकरीसाठीचे अर्ज करताना मराठी भाषेला प्राधान्य देण्याचे इ-प्रशासन धोरण महाराष्ट्र शासनाने जाहीर करूनही, बहुतांश विभागांच्या अर्जांमध्ये मराठी भाषेचा पर्यायच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे.
शासनाच्या इ-प्रशासन धोरणानुसार डाटाएण्ट्री करताना मराठीला प्राधान्य देण्याबाबत शासनाने 2013-14 मध्ये आदेश काढला होता. मात्र अद्याप इ-कारभार व नोकरीचे अर्ज इंग्रजीत आहे. ज्यांना इंग्रजीचे जुजबी ज्ञान आहे अथवा इंग्रजीच येत नाही त्यांच्याकडून चुका होण्याचे प्रमाण वाढत आहे. कार्यालयामध्येही कोणी मदत करत नसल्याने अशा अर्जदारांचा खोळंबा होऊन त्यांना नोकरीचे अर्ज करताना मोठय़ा अडचणी येतात. शासनाच्या धोरणानुसार डाटाएण्ट्री करताना मराठीता वापर करवा, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.
अर्ज भरताना इंग्रजी भाषेची अडचण होते
नोकरीचे अर्ज भरताना इंग्रजीची अडचण होते. मराठी भाषेचा पर्याय असल्यास चुका होत नाहीत. अर्ज चुकल्याने परीक्षेपासून वंचित राहावे लागते. बहुतांश वेळा मी शिपाई प्रवर्गासाठी अर्ज केला. मात्र अद्याप उत्तर आले नाही. शांताराम वळवी, उमेदवार

नोकरीचे अर्ज इंग्रजीत
बहुतांश नोकरीचे अर्ज इंग्रजी भाषेत असल्याने, असे अर्ज भरण्यापासून असंख्य उमेदवार वंचित राहतात. मराठी भाषेमध्ये मोजक्याच विभागांचे अर्ज उपलब्ध आहेत.

काय आहे इ-प्रशासन धोरण
शासनाच्या सर्व विभागात इ-प्रशासन धोरणानुसार द्विभाषीय वापर होतो. यामध्ये मराठीला प्राधान्य देण्यात यावे असा आदेश 2013-14 मध्ये काढण्यात आला आहे. सरकारच्या सर्वच विभागांना याबाबत तात्काळ अंमलबजावणीचे आदेशही देण्यात आले आहेत. मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या हेतू यामागे आहे.