आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी दिन विशेष: पालिकेच्या शाळांमध्ये अाता विद्यार्थ्यांची हजेरी हाेणार ‘अाॅनलाइन’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - निखिल पवार.. हजर सर, तृप्ती पाटील... हजर सर... संभाजी कपाटे... नाही अाला सर... शाळा भरल्यानंतर प्रत्येक वर्गातून येणारे हे हजेरीचे अावाज अाता महापालिकांच्या शाळांमध्ये बंद हाेणार अाहे. हजेरीच्या प्रक्रियेतील विद्यार्थ्यांचा वेळ वाचावा तसेच पाेषण अाहारातील अफरातफर दूर हाेऊन संबंधित विद्यार्थ्यांपर्यंतच हा अाहार पाेहचावा या उद्देशाने शिक्षण मंडळाने शहरातील २४ शाळांमध्ये ‘अाॅनलाइन प्रेझंेटी’चा प्रयाेग यशस्वी केला अाहे. हा प्रयाेग पथदर्शी ठरल्याने येत्या शैक्षणिक वर्षापासून महापालिकेच्या सर्वच वर्गांमध्ये अशाप्रकारची हजेरी घेतली जाणार अाहे. 
 
महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने विद्यार्थी हिताच्या दृष्टीने काही महिन्यांपूर्वी टीसीएल कंपनीच्या मदतीने अाॅनलाइन प्रेझेंटी’चा प्रयाेग सुरू केला. यात प्रत्येक वर्गात पाच विद्यार्थ्यांना गटात उभे करून त्यांचा माेबाइलद्वारे फाेटाे घेतला जाताे. हा फाेटाे संबंधित शिक्षक शिक्षण मंडळाच्या अॅप्लिकेशनवर राेज डाउनलाेड करतात. अर्थात या पाच विद्यार्थ्यांना एखादा प्रश्न विचारून उत्तर देण्यासाठी उभे केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासही तपासला जाताे अाणि हजेरीचेही काम हाेऊन जाते. 
 
यातून सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाेषण अाहार संबंधित विद्यार्थ्यांपर्यंतच पाेहाेचल्याची शाश्वती देता येते. अाजवर काही विद्यार्थी अनुपस्थित असतानाही वर्गात सगळेच विद्यार्थी उपस्थित अाहेत, असे दाखवून पाेषण अाहारात अफरातफर करण्याचे काही ठिकाणी प्रकार हाेते. अपहाराच्या या अपकृत्यामुळे बऱ्याचदा राेज शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यावरही अन्याय हाेत असल्याच्या तक्रारी हाेत्या. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाने अाॅनलाइन प्रेझेंटीचा फंडा वापरून बघितला. त्यात पटावर विद्यार्थ्यांची वास्तव संख्या नियमितपणे समजत असल्याने येत्या शैक्षणिक वर्षापासून महापालिकेच्या १२७ शाळांमध्ये ही व्यवस्था सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली. 
 
शिक्षणापासून दूर असलेल्या समाजबांधवांच्या मनात शिक्षणाचे महत्त्व रुजवण्याचे महान कार्य भारतरत्न डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांनी केले. त्यांच्या ‘शाळा प्रवेशा’चा साेहळा अाता दर नाेव्हेंबर राेजी ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा हाेणार अाहे. यानिमित्ताने शाळा-शाळांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन अादी उपक्रमांचे अायाेजन करण्यात येणार अाहे. यासंदर्भात शालेय शिक्षण क्रीडा विभागाने परिपत्रक जारी केले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...