आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक जिल्ह्यात ऑनलाइन बँकिंगचा बोलबाला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ऑनलाइन बॅँकिंग लोकप्रिय होत असून, वर्षभरात जिल्ह्यात तीचा वापर वाढला आहे. प्रमुख बॅँक असलेल्या स्टेट बॅँकेचेच जिल्ह्यातील 90 हजार ग्राहक ऑनलाइन बॅँकिंग सेवा वापरत असल्याने, जिल्ह्यात ऑनलाइन बॅँकिंगचा बोलबाला आहे.

दुसरीकडे, चेकच्या वापरावर लवकरच ग्राहकांना पैसे मोजावे लागू शकतात. रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडिया याबाबत नवी तरतूद आणण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. बॅँकिंग व्यवहारात रोकडचा वापर कमी करून ऑनलाइन बॅँकिंगवर भर देण्यासाठी हे पाऊल उचलले जाणार आहे. पैसे हस्तांतरित करण्यासाठी इंटरनेट किंवा मोबाइल बॅँकिंगचा वापर करणे, शॉपिंगसाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करण्यासाठी सर्रास ऑनलाइन बॅँकिंगचा वापर केला जात आहे. तरीही जिल्ह्याचे मुख्य क्लिअरिंग केंद्र असलेल्या स्टेट बॅँकेच्या क्लिअरिंग हाउसमध्ये दैनंदिन 40 हजार चेकचा निपटारा सुरू असतो. चेकच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी सीटीएस चेक प्रणाली रिझर्व्ह बँक 1 एप्रिलपासून अमलात आणत आहे. लवकरच चेकच्या वापरावर मोजावे लागणारे शुल्क हे पुढचे पाऊल ठरणार आहे.

ऑनलाइन बँकिंग सुरक्षित व्हावी
शहरातील एका ग्राहकाच्या डेबिट कार्डवर अमेरिका आणि इंग्लंडमध्ये झालेल्या खरेदीचा विषय ताजा असतानाच, एका नामांकित बॅँकेच्या संचालकाच्या खात्यातून परस्पर एक कोटी रुपये अवघ्या 45 मिनिटांत चोरट्यांनी उडविले. त्यापैकी एकाला पोलिसांनी अटक करीत 60 लाख रुपये हस्तगत केले. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित करण्यावर सामान्य नागरिकांचा भर आहे.

ऑनलाइन बॅँकिंग सुरक्षितच
ऑनलाइन बॅँकिंगमध्ये फसवणुकीच्या घटना घडतात हे मान्य असले तरी वापराच्या तुलनेत या घटनांचे प्रमाण खूपच अल्प आहे. प्रत्येक बॅँकेकडून ऑनलाइन बॅँकिंग करताना काय काळजी घ्यावी, याबाबत मेल, मेसेजेस, माहितीपत्रके, वृत्तपत्रातील जाहिराती यातून वारंवार जागरूकता केली जात असते, ग्राहकांनी ती पाळली पाहिजे. बाबुलाल बंब, क्षेत्रीय महाव्यवस्थापक, स्टेट बॅँक ऑफ इंडिया

हे करा काळजी मिटेल
0 ऑनलाइन बॅँकिंगच्या सुरक्षिततेची किल्ली म्हणजे तुमचा पासवर्ड असतो.
0 पासवर्ड कोणालाही सांगू नका.
0 कुठेही लिहून ठेवू नका.
0 पासवर्ड कायम बदलत राहा.
0 बॅँकांची सिक्युरिटी फिचर्स असतात. ती पाळली गेली तर ऑनलाइन बॅँकिंग सुरक्षित आहे.
0 अनोळखी संगणकावरून ऑनलाइन व्यवहार करू नका. दुसर्‍याचे संगणक वापरू नका.