आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅनलाइन गुन्हे चिंताजनक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जैन साेशल ग्रुपतर्फे कालिदास कलामंदिरात आयोजित \"सायबर सिक्युरिटी\'वरील कार्यशाळेत पालक-विद्यार्थी तरुणाईला मार्गदर्शन करताना सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ रक्षित टंडन. - Divya Marathi
जैन साेशल ग्रुपतर्फे कालिदास कलामंदिरात आयोजित \"सायबर सिक्युरिटी\'वरील कार्यशाळेत पालक-विद्यार्थी तरुणाईला मार्गदर्शन करताना सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ रक्षित टंडन.
नाशिक-फेसबुक,व्हॉट‌्सअॅपसह सर्वच देशी-विदेशी सॉफ्टवेअर्सपासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली असून, ‘अाॅनलाइन लाइफ’मधील वाढती गुन्हेगारी सध्या चिंतेचा विषय बनला अाहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर सुरक्षितपणे करा, असा सल्ला सायबर सुरक्षातज्ज्ञ रक्षित टंडन यांनी दिला.

जैन साेशल ग्रुप, नाशिक शाखेतर्फे रविवारी महाकवी कालिदास कलामंदिर येथे अायाेजित "सायबर सिक्युरिटी' विषयावर टंडन बाेलत हाेते. या वेळी ग्रुपचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, सचिव विजय लाेहाटे, हेमंत दुगड विनाेद पहाडे यांच्यासह पालक, विद्यार्थी तरुण माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. थोड्याशा दुर्लक्षामुळे तंत्रज्ञान कसे धोकेदायक ठरू शकते, आपल्या खासगी आयुष्यात डोकावू शकते हे टंडन यांनी या वेळी साेदाहरण सांगितले. तसेच प्रात्यक्षिकांमधून त्यांनी तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर कसा करावा, याची माहिती दिली.

टंडन पुढे म्हणाले की, टोरंट‌्स इतर अॅप्सच्या माध्यमातून मालवेअर इतर व्हायरस शिरकाव करतात. आपल्या संगणक मोबाइलवरील गोपनीय माहितीही ते मिळवू शकतात. इ-मेल वापरताना "एनआयसी'चा सोर्स असलेला इ-मेल वापरणे कमी जोखमीचे अाहे. तसेच, अत्यंत कठीण असे पासवर्ड टाकणे, पासवर्ड वारंवार बदलणे या गोष्टी सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचेही टंडन म्हणाले. भारतात सुमारे तीनशे दशलक्ष लोक त्यांच्या मोबाइलवरून इंटरनेट अॅक्सेस करतात त्यातील ६५ टक्के विद्यार्थी आहेत.

साेशलसाइटवर हॅकर्सची दादागिरी इंटरनेटवरविशेषतः सोशल नेटवर्किंग साइट्स असाे वा बँकिंग या क्षेत्रात हॅकर्सची दादागिरी माेठ्या प्रमाणात वाढली असून, हॅकर्सकडून अकाऊंट हॅक केले जात अाहेत. यातून विविध प्रकारे लहान मुलांचा छळ होत आहे. तक्रार करण्यासाठी त्यांना योग्य मार्ग दिसत नाही. त्यामुळेच लहान मुलांशी संबंधित सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी सरकारच्या टेलिकॉम, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी खात्यांकडून वेगळ्या धोरणाची आखणी करण्याचे काम सुरू अाहे.

कुंभमेळ्यात अफवांवर विश्वास नकाे
अाजकालव्हाॅट‌्सअॅपवर याचे निधन झाले, इकडे अपघात झाला, तसेच बाॅम्ब ठेवला अाहे यासारखे खोटे संदेश फिरताना दिसतात. कुंभमेळा पर्वणी काळात लाखाे भाविक नाशिकमध्ये दाखल हाेणार अाहेत. अशा खोट्या संदेशांमुळे चेंगराचेंगरीसारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा संदेशांवर खातरजमा केल्याशिवाय विश्वास ठेवू नका, असा सल्लाही टंडन यांनी या वेळी दिला.

लहान मुलांशी संबंधित गुन्ह्यांसाठी धाेरण
"तूछान दिसते' किंवा "तुझा लूक मला आवडला' अशा अनोळखी व्यक्तीच्या प्रत्यक्ष बोलण्याला एखाद्या किशोरवयीन मुलीचे प्रत्युत्तर वेगळे असते. मात्र, अशा कमेंट्स फेसबुक वा व्हाॅट‌्सअॅपद्वारे केल्या तर तीच मुलगी त्याला थँक्स म्हणते. "डिजिटल एज'मधील मुलांमध्ये हा फरक स्पष्ट दिसतो. त्यामुळेच लहान मुलांशी संबंधित सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी सरकार धोरण आखत आहे.
डिजिटल इंडिया'मधून गुन्ह्यांना प्रतिबंध
पंतप्रधाननरेंद्र माेदी यांनी नुकताच डिजिटल इंडिया मिशनचा शुभारंभ केला असून, यात सायबर गुन्हे राेखण्यासाठी उपाययाेजना करण्यात अाल्याची माहिती टंडन यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. केंद्र सरकारकडून सायबर गुन्हे राेखण्यासाठी प्रयत्न केले जात अाहेत. त्यासाठी हे मिशन महत्त्वपूर्ण ठरेल. तंत्रज्ञान झपाट्याने विकसित हाेत अाहे, त्याचप्रमाणे गुन्ह्यांमध्ये वाढ हाेत अाहे. त्यामुळे जनजागृती लाेकांनी स्वतः सावधानता बाळगणे अावश्यक अाहे. या गुन्ह्यांतील अाराेपींच्या कठाेर शिक्षेसाठी "सायबर लाॅ'मध्ये बदल अपेक्षित अाहे. बी. ई, बी. टेक. अभ्यासक्रमांमध्ये सायबर विषय समाविष्ट करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या दिल्या टिप्स
एटीएमकार्डचा पासवर्ड वेळाेवेळी बदलत राहा
माय काॅण्टॅक्टमधून नकाे असलेले नंबर डिलिट करा
स्मार्टफाेनमधील मीडिया डाउनलाेडर बंद ठेवा
काेणतीही बँक फाेन करून एटीएम पासवर्ड अथवा कार्डनंबर मागत नाही, त्यामुळे फाेन अाल्यास पासवर्ड वा कार्डनंबर देऊ नका.
कमीत कमी पाच वर्षे अॅण्टिव्हायरस अपडेट ठेवा
नेटबँकिंग वापरताना व्हर्च्युअल की-बाेर्ड वापरा
पासवर्ड टाकताना स्माॅल लेटर, कॅपिटल लेटर, नंबर अाणि विशेष चिन्हांचा वापर करा. जेणेकरून पासवर्ड सहजासहजी हॅक करता येणार नाही.
बातम्या आणखी आहेत...