आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मादायच्या अाॅनलाइनचा खेळखंडाेबा कायम, संकेतस्थळामधील अनेक त्रुटींमुळे नागरिक हैराण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सेवाभावी काम करणाऱ्या विश्वस्तांचा वेळ चकरा वाचाव्यात यासाठी धर्मादाय अायुक्तालयात वाजतगाजत सुरू केलेल्या अाॅनलाइनचा खेळखंडाेबा झाला असून, या संकेतस्थळामध्ये अनेक त्रुटी असल्याचे दिसून येत अाहे. लेखापरीक्षण अहवाल दाखल करण्यासाठी तर विश्वस्तांना धर्मादायचे उंबरठे पुन्हा पुन्हा झिजवावे लागत असून यामुळे राेगापेक्षा इलाज जालीम केल्याच्या प्रतिक्रिया विश्वस्त मंडळाकडून व्यक्त हाेत अाहेत. 
 
धर्मादाय यंत्रणेत डिजिटलायझेशनचे वारे वाहू लागले अाहेत. त्यासाठी अायुक्तालयाने माेहीमच हाती घेतली अाहे. धर्मादाय यंत्रणेतील कामकाज जलद, पारदर्शक तसेच विनाअडथळा व्हावे या उदात्त हेतूने करण्यात अालेल्या या सेवेचा शुभारंभही झाला अाहे. या विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीमुळे विश्वस्तांना चकरा माराव्या लागू नये यासाठी काळजी घेण्याचाही उद्देश यामागे हाेता. संस्थांची नाेंदणी, वर्गणी परवानगी अशा टप्प्याटप्प्याने सर्व सुविधा अाॅनलाइन करून देण्याचे प्रयत्न असून त्याची सुरुवातही करण्यात अाली अाहे. गणेशाेत्सवाच्या परवानग्या अाॅनलाइन केल्यानंतर मात्र या परवानग्या घेण्याचे प्रमाणच कमालीचे घटले अाहे. त्यापाठाेपाठ हिशेबपत्रके अाॅनलाइन दाखल करणे सक्तीचे करण्यात अाले अाहे. तीन महिन्यांपूर्वी घेण्यात अालेल्या या निर्णयामुळे विश्वस्तांमध्ये अानंदाचे वातावरण निर्माण झाले हाेते. धर्मादायच्या फेऱ्यातून सुटका हाेण्याच्या अानंदात असलेल्या विश्वस्तांना मात्र त्यानंतर पुन्हा याच फेऱ्यात अडकावे लागत अाहे. 

धर्मादायचे संकेतस्थळ वारंवार नादुरुस्त हाेत असून त्यात अनेक तांत्रिक त्रुटीही अाहेत. तसेच त्याबाबत माहिती देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाही नाही. हिशेबपत्रके दाखल केल्यानंतरही कर्मचाऱ्यांकडून काही ना काही कारणे सांगून पुन्हा चकरा मारण्याची वेळ अाणली जात अाहे. ‘तुमची फाइल दिसत नाही’, ‘तुम्ही पुन्हा सादर करा’, ‘माहिती दाखल नाही’, अशी काही ना काही कारणे सांगून कर्मचारी विश्वस्त, लेखापरीक्षक यांना भंडावून साेडत अाहेत. याबाबत अनेक विश्वस्तांनी तक्रारीही केल्या असून थेट अायुक्तालयाकडे बाेट दाखविले जात अाहे. 
 
तांत्रिक दाेष दूर करावेत 
अाॅनलाइन व्यवस्थेतीलतांत्रिक दाेष दूर करावेत. विश्वस्तांना चकरा मारण्याची वेळे येणे हा धर्मादायमधील विराेधाभास अाहे. 
- मंगेश नागरे, विश्वस्त 
 
हिशेेबपत्रके सादर करताना विश्वस्तांची घालमेल 
सप्टेंबरअखेर हिशेबपत्रके दाखल करण्याची मुदत असल्याने विश्वस्तांची घालमेल हाेत अाहे. संकेतस्थळावर तसेच कर्मचाऱ्यांची वागणूक अशीच राहिल्यास मुदतीत हिशेेबपत्रके दाखल करणे अशक्य हाेणार अाहे. सुमारे २५ टक्के संस्थांनी हिशेबपत्रके अद्याप दाखल केलेली नाहीत. अशातच त्यांना सरकारी यंत्रणेचा विचित्र अनुभव येत असल्याने राेगापेक्षा इलाज जालीम अशी प्रतिक्रिया व्यक्त हाेत अाहे. 
बातम्या आणखी आहेत...