आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक अाॅनलाइन; तक्रार मात्र अाॅफलाइन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मोबाइलवर कॉल करून लॉटरी तत्सम बक्षिसांचे अामिष दाखवून हजारो रुपयांनी गंडा घालण्याचे प्रकार सध्या शहरात जोरात सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अशा ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर एटीएम कार्ड ब्लॉक झाले, बँकेकडून पडताळणी सुरू आहे, पीननंबर, ओटीपी नंबरची मागणी करत लाखोंची फसवणूक केली जात असल्याचे प्रकारदेखील समाेर अाले अाहेत. मात्र, पोलिस यंत्रणा याकडे तक्रार येत नसल्याने सपशेल दुर्लक्ष करीत आहे. आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल येत असल्याने भारतालगत असलेल्या देशांमधून असे रॅकेट चालविले जात असल्याचा संशय व्यक्त होताे अाहे. गेल्या महिनाभरात ऑनलाइनद्वारे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची लाखोंची फसवणूक झाल्याचे पुढे अाले अाहे. 
 
पोलिसांचे दुर्लक्ष 
शहरात गेल्या तीन महिन्यात ३२ जणांची लाखोंची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे पुढे अाले अाहे. अनेक फसवणूक झालेले नागरिकच तक्रार करण्यास टाळाटाळ करत असल्याने अशा प्रकारांत वाढ होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, शहरातील काही पोलिस ठाण्यात यासंदर्भातील तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचीही तक्रारही नागरिकांनीच डी. बी. स्टारकडे दिल्याने खरे काेण? असा प्रश्न निर्माण झाला अाहे. 
अनिल पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर क्राइम 

नागरिकांना घातला गंडा २५ हजारांची फसवणूक.. 
^मला ०९६५४९८१५७१ या क्रमांकावरून फोन आले होते. एका व्यक्तीने विचारले ‘सर तुम्हाला लोन पाहिजे असेल तर २५ हजारांची इन्शुरन्स पाॅलिसी घ्यावी लागेल’. मला लोनची गरज होती म्हणून पाॅलिसी घेतल्यानंतर कोणाचेही फोन आले नाही. त्यानंतर त्यांचे फोनही बंद झालेले अाहेत. -तक्रारदार, नाशिकरोड 

डिस्प्यूट फाॅर्मद्वारे रक्कम पुन्हा खात्यात जमा 
रिझर्व्ह बँक परिपत्रकानुसार ग्राहकाची चूक नसल्यास त्याला पैसे परत देण्याची जबाबदारी संबंधित बँकेची अाहे.यासाठी बँकेत ग्राहकाकडून ‘डिस्प्यूट’ फॉर्म भरून घेतला जातो. पोलिसांचा अभिप्राय घेत बँक ग्राहकाची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करते. शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी अनिल सुरेश बाविस्कर यांच्या आयसीआयसीआय बँक खात्यातून परदेशात दाेन लाख हजारांची खरेदी करून रक्कम फसवणूक झाली होती. पोलिसांनी बाविस्कर यांच्याकडून बँकेत डिस्प्यूट फॉर्म भरून घेण्याच्या सूचना दिल्या होते.त सेच पोलिसांनी आयसीआयसीआय बँकेला इ-मेलद्वारे या प्रकाराची माहिती देत २० जून ते २३ जून या कालावधीत तक्रारदार परदेशात गेलेले नसून, त्यांचे एटीएम कार्डही त्यांच्याकडेच आहे. सदर रक्कम आयसीआय सीअाय बँकेच्या परदेशातील खात्यातून वर्ग झाली आहे, असे मुद्दे मांडत तक्रारदाराची यामध्ये काही चूक नसल्याचे सर्व पुरावे बँकेला सादर केल्याने बाविस्कर यांना त्यांची संपूर्ण रक्कम परत मिळाली. 
ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. मे महिन्यात सायबर पोलिस ठाणे सुरू झाल्यापासून आजपर्यंत ३२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या गुन्ह्यांचा तपास सुरू असला तरी बहुतांशी गुन्ह्यांत ग्राहकांकडून भलत्याच व्यक्तीला ओटीपी, पिन नंबर दिल्यानंतर यांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. बँकेतून बोलतोय, एटीएम कार्ड ब्लॉक झाले, बँकेकडून पडताळणी सुरू आहे, पिन नंबर, ओटीपी नंबरची मागणी केली जाते. यास बहुतांशी ग्राहक फसतात. सर्व बँक डिटेल देतात. दोन दिवसांत या ग्राहकांच्या बँक खात्यातून ऑनलाइन रक्कम काढली जाते. अशाप्रकारचे ३२ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये ३० गुन्ह्यांत ग्राहकांची चूक असल्याचे निदर्शनास आले आहे. ३२ गुन्ह्यात १० लाखांची अाॅनलाइन फसवणूक झाल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले. 

सायबर क्राइम 
सायबर क्राइम हा पारंपरिक गुन्ह्याप्रमाणेच असतो. फक्त तो सायबर स्पेसमध्ये अर्थात इलेक्ट्राॅनिक काॅम्प्युटरच्या मदतीने केलेला असल्याने त्याला सायबर क्राइम म्हणतात. थोडक्यात काॅम्प्युटर क्षेत्रामध्ये केलेल्या गुन्ह्यांना सायबर क्राइम किंवा सायबर गुन्हा असे म्हटले जाते. 

केवळ तक्रार नोंदणीच 
ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर त्याची माहिती पोलिस ठाण्यात दिल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घेत तक्रारी नोंदविली जाते. मात्र, या तक्रारींचे पुढे काय होते. याची माहिती तक्रारदारांना दिलीच जात नसल्याची काही तक्रारी डी. बी. स्टारकडे आली आहे. 
 
प्रकरण : ४० लाख रुपयांचा गंडा 
विटावे (ता. चांदवड) येथील सरपंच रवींद्र भागूजी ठाकरे यांच्याकडून एटीएम कार्ड नंबर, जन्मतारीख मिळवत त्यांना सुमारे ४० हजारांचा गंडा घातल्याचे समोर आले. रवींद्र ठाकरे यांच्या माेबाइलवर ७४७९१५३३७० या क्रमांकावरून कॉल आला. समोरील व्यक्तीने आपण एसबीआय बेलापूर शाखेतून बोलत असल्याचे भासवून बँक खाते अपडेट करावयाचे असल्याचे सांगून ठाकरे यांच्याकडे एटीएमचा सोळा अंकी नंबर जन्मतारीख मागितली. मात्र, ठाकरे यांनी याबाबत विचारपूस केली असता त्याने ‘मॅनेजर साहेबांशी बोलून घ्या’ असे सांगून दुसऱ्या अज्ञात व्यक्तीशी बोलावयास लावले. त्यावेळी ठाकरे यांनी त्यांना सोळा अंकी नंबर जन्मतारीख सांगितली. त्यानंतर ठाकरेंच्या स्टेट बँकेच्या खात्यावरून ३९ हजार ९९२ रुपयांची खरेदी झाल्याचे मोबाइल संदेशावरून फसवणूक झाल्याचे ठाकरे यांच्या लक्षात आले. 
 
प्रकरण : 2 काेटी, ७६ लाख रुपयांचा लकी ड्राॅ 
शहरातील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या मेलवर भारतीय रिझर्व्ह बँक या नावाने एक मेल मिळाला. यात तिला चार कोटी ७६ लाख ४० रुपयांचा लकी ड्राॅ लागल्याचे कळले. तसेच पैसे तुमच्या खात्यात जमा करण्यासाठी rbicompersation.93@hotmail.com या इ-मेलवर नाव, पत्ता, वय, ई-मेल आयडी, बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक, खातेधारकांचे नाव, बँक ब्रांच, तुम्ही जिंकलेले पैसे, तुम्ही अगोदर किती पैसे भरू शकता अशाप्रकारे माहिती देण्याचे त्यात सांगण्यात आले होते. अशाच प्रकारचे अजून काही इ-मेल तिला गेल्या महिनाभरापासून येत असल्याचे त्या विद्यार्थिनीने सांगितले. अशा काेणत्याही प्रकारच्या मेलला तिने कधीच उत्तर दिले नाही म्हणून ती वाचली. मात्र, अनेकजण अशा मेलला उत्तरे देतात, अापली सगळी माहिती पलिकडच्या व्यक्तीला सांगतात अाणि फसतात. 
 
प्रकरण : ३० हजारांची पाॅलिसी काढावी लागेल 
आम्ही सिटी बँकेमधून बोलतोय, लोनची गरज आहे का?’ अशा प्रकारचे गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेकजणांना फोन येतात. यात महिला आणि पुरुष दोघांचेच आवाज असतात. लोन पाहिजे असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची मिळकत किंवा कागदपत्रे देण्याची गरज नाही असे सांगण्यात येत आहे. त्यासाठी केवळ २५ ते ३० हजारांची पाॅलिसी काढावी लागेल. त्यासाठी अाम्ही सांगताे त्या खात्यात पैसे टाकावे लागतील, असेही या दूरध्वनीवर सांगण्यात येत अाहे. शहरातील एका व्यक्तीला असाच फोन आला आणि त्याची २५ हजारांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार डी. बी. स्टारकडे प्राप्त झालेली आहे. तर अनेकांनी यासंदर्भात काहीच प्रतिसाद दिला नसल्याने ते वाचले. अशा प्रकरणांसंदर्भात नागरिकांनी थेट पाेलिसांकडे तक्रार करण्याची गरज निर्माण झाली अाहे. 

तपास धिम्या गतीने 
^गेल्या दोन वर्षांपूर्वी माझ्या खात्यातून १३ हजार रुपये अशाच प्रकारे फसवून काढण्यात आले होते. यानंतर पोलिस आयुक्तालयात लेखी तक्रार दिली होती. त्याचे पुढे काय झाले. ते माहितीच पडले नाही. -नितीन मोहोड, तक्रारदार 
 
‘बँकेतून बोलतोय, एटीएम कार्ड ब्लॉक झाले, बँकेकडून पडताळणी सुरू आहे’, असे सांगून पिन नंबर, ओटीपी नंबरची मागणी करत लाखोंची फसवणूक करण्याचा ऑनलाइन गोरखधंदा सध्या तेजीत असल्याचे प्रकार डी. बी. स्टारच्या पाहणीत समोर आले आहे. त्याचबरोबर‘तुम्ही कोट्यवधी रुपये जिंकला आहात’ असा एसएमएस इ-मेल पाठवून त्याच्या कागदपत्रांसाठी आठ-दहा हजार रुपये तत्काळ आमच्या खात्यात भरा, अशा मेसेजद्वारे फसवणुकीचा नवा फंडा भामट्यांच्या टोळीने सुरू केला आहे. नागरिक त्याला भुलतात अाणि फसवणूक हाेते. याबाबत तक्रार करण्यासाठी फारसे काेणी पुढे मात्र येत नाहीत असे चित्र अाहे. यावर डी. बी. स्टारने टाकलेला प्रकाशझोत.... 
{शहरात ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे का? 
}ऑनलाइनफसवणुकीचे गेल्या दोन महिन्यांत १५ गुन्हे दाखल आहे. 
{हेप्रकार कमी व्हावे याकरिता काय उपाययोजना केल्या जात आहेत? 
}सायबर सेलतर्फे शाळा-महाविद्यालयांत, कंपनीत नागरिकांच्या कमिट्या तयार केल्या आहेत. 
{अनेकांच्या मेलवर अारबीअायच्या नावाने मेल अाले अाहेत? 
}अशामेलकडे नागरिकांने दुर्लक्ष करावे. आजच असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
{‘डिस्प्यूट’ फॉर्म म्हणजे काय? 
}रिझर्व्हबँक परिपत्रकानुसार ग्राहकाची चूक नसल्यास त्याला पैसे परत देण्याची जबाबदारी संबंधित बँकेची अाहे. यासाठी बँकेत ग्राहकाकडून ‘डिस्प्यूट’ फॉर्म भरून घेतला जातो. 
बातम्या आणखी आहेत...