आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ, ३२ नागरिकांना घातला गंडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ऑनलाइन फसवणूकीच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. मे ला सायबर पोलिस ठाणे सुरू झाल्यापासून आजपर्यंन्त ३२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या गुन्ह्याचा तपास सुरू असला तरी बहुतांशी गुन्ह्यात ग्राहकांकडून भलत्याच व्यक्तीला ओटीपी, पिन नंबर दिल्यानंतर यांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. 
 
सायबर पोलिस ठाण्यात सर्वाधिक गुन्हे सोशल मीडियाद्वरे फसवणूक झाल्याचे दाखल होत आहेत. यामध्ये ऑनलाइन गंडा घातल्याच्या गुन्ह्यांची संख्या सर्वाधिक आहे. बँकेतून बोलतोय, एटीएम कार्ड ब्लॉक झाले, बँकेकडून पडताळणी सुरू आहे, पिन नंबर, ओटीपी नंबरची मागणी केली जाते. यास बहुतांशी ग्राहक फसतात सर्व बँक डिटेल देतात. दोन दिवसांत या ग्राहकांच्या बँक खात्यातून ऑनलाइन रक्कम काढली जाते. अशा प्रकारचे ३२ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये ३० गुन्ह्यांत ग्राहकांची चूक असल्याचे निदर्शनास आले आहे. ३२ गुन्ह्यात १० लाखांची अाॅनलाइन फसवणूक झाल्याचे सायबर पोलिसांनी सांगीतले. या गुन्ह्यांमध्ये संशयितांना पकडणे शक्य होत नाही. चार ते पाच ठिकाणी ऑनलाइन खरेदी दाखवत नंतर एटीएमद्वारे पैसे काढले जातात. 

बंॅक ग्राहकांनी सतर्क राहावे 
^बँकेतून बोलत असल्याचे सांगत बहुतांशी ग्राहक बँक डिटेल देतात. काही वेळात बँक खात्यातील सर्व रक्कम काढली जाते. ग्राहकांनी पिन नंबर, खाते नंबर, ओटीपी देण्यापूव र्ी बँकेत जाऊन खात्री करावी. -अनिल पवार वरिष्ठ निरिक्षक, सायबर पोलिस ठाणे 
 
बातम्या आणखी आहेत...