आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता ऑनलाइन करा गणेशमूर्तीची निर्मिती...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शॉपिंग, बँकिंग, बुकिंग हे सर्व ऑनलाइन झाल्यावर आता गणपती मेकिंग हा उपक्रमही ऑनलाइन सुरू करण्यात आला आहे. याद्वारे गणेशभक्तांना घरच्या घरी आपली गणेशमूर्ती तयार करण्याचे ऑनलाइन प्रशिक्षण मिळणार आहे.

सणांचा महिना श्रावण सुरू होताच वेध लागतात ते गणपती बाप्पाच्या आगमनाचे. या
कालावधीत चित्रशाळांमध्ये गणेशाच्या सुरेख मूर्ती घडवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी भाविकांची
लगबग सुरू होते. आता ऑनलाइन मूर्ती घडवण्याचे धडे मिळत असल्याने देशातीलच नव्हे, तर परदेशातीलही भाविकांनाही सहजतेने मूर्ती उपलब्ध होतील. पुण्यातील एका सामाजिक संस्थेच्या वेबसाईटद्वारे ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

इकोफ्रेंडली गणेशमूर्ती घडवण्यासाठी त्यांनी तीन तासांचा विशेष डेमो तयार केला आहे. यात गणपतीची मूर्ती घडवण्याचं प्रशिक्षण देण्यात आले आहे. ज्यामुळे पैसे तर वाचतीलच पण, मुख्य म्हणजे स्वत: मूर्ती घडवल्याचे समाधानही आता भाविकांना मिळणार आहे.
असा बनवा इको फ्रेंडली बाप्पा
इको फ्रेंडली गणपती तयार करताना कागद, टिश्यूपेपर, माती, वॉटरकलर, भाज्यांपासून तयार केलेले रंग, डिंकापासून बनविलेला गम, कापड इत्यादी साहित्य लागते. 1) कागद किंवा वर्तमानपत्र पाण्यात भिजवून लगदा करावा. 2) मंद आचेवर गम व पाणी यांचे मिश्रण गरम करावे. 3) हे मिश्रण थंड झाल्यावर गाळून मिश्रणातील गम वेगळा करावा. 4) गाळलेल्या गममध्ये कागदाचा लगदा एकत्रित करून त्यात व्हाईट इंक पावडर घालावी व पावासारखे मऊ मिश्रण तयार करावे. 5) हे मिश्रण साच्यामध्ये घालून प्रेस करावे. त्यामुळे साच्याचा आकार लगद्यावर छापला जातो. 6) वरीलप्रकारे मागची व पुढ़ची बाजू साच्यात भरून ध्यावी. 7) त्यावर बायडिंग गमच्या मदतीने 2-3 पेपर तुकड्यांचे थर लावावे. 8) दोरी व गमच्या साहाय्याने साचा घट्ट बंद करावा. 9) साचा वाळल्यावर एकेक भाग काढून घ्यावे. 10) पॉलिश पेपर किंवा मेटल फाइलच्या साहाय्याने मूर्तीला फिनिशिंग द्यावे. 11) नंतर हवे त्याप्रमाणे रंगकाम करावे.
ऑनलाइन प्रशिक्षणाचा फायदा..
या वर्षापासून मी स्वत: घरच्या घरीच इकोफ्रेंडली गणपतीची मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाइन प्रशिक्षणामुळे मला मूर्ती तयार करता आली. तसेच अनेक वर्षांची माझी इच्छा होती की मी स्वत: माझ्या लाडक्या बाप्पांची मूर्ती तयार करेन. परंतु, ती पूर्ण हाेत नव्हती. ऑनलाइन प्रशिक्षण सुिवधा उपलब्ध करून िदल्यामुळे माझी ही इच्छा अाता पूर्ण हाेऊ शकली अाहे.
अभिषेक भोळे, भाविक