आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककरांमध्ये ऑनलाइन गॅस सिलिंडर सबसिडीने संभ्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ऑनलाइन गॅस सबसिडीची योजना दोन महिन्यांपासून सुरू आहे. त्याचे अनुदान थेट बॅँक खात्यात जमा होते. मात्र त्यात तफावत येत असल्याने ग्राहक संभ्रमात आहेत. प्रशासनाने याबाबत सर्व अधिकार कंपन्यांना असल्याचे सांगत तक्रार केल्यास कारवाईचे आश्वासन दिले असून गॅस कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनीही छापील पावतीपेक्षा अधिक पैसे न देण्याचे आवाहन केले आहे.
गॅस सिलिंडर ग्राहकांना प्रथमत: बाजार भावाने खरेदी करावे लागत आहे. त्यानंतर आगाऊ रक्कम आणि गॅसची सबसिडी ग्राहकांच्या खात्यात थेट जमा केली जात आहे. मात्र, 1075 रुपयांना खरेदी केलेले सिलिंडर ग्राहकांना 46 रुपयांना महाग पडत आहे. प्रथम 435 रुपये खात्यात जमा होतात व सिलिंडर मिळाल्यानंतर किंवा नोंदणीनंतर 594 असे 1029 रुपये मिळतात. प्रत्यक्षात त्यास पाच ते सहा दिवसांपेक्षा अधिक कालावधी जात आहे. परंतु या रकमेत 46 रुपयांचा फरक आहे. हा कर 31.45 असल्यास उर्वरित 15 रुपये म्हणजे ग्राहकांची लूटच आहे.
ही कर वसुली
431.45 रुपयांचा सध्या फरक पडत आहे. त्यापेक्षा अधिक पडत नाही. पडत असल्यास ग्राहकांनी तक्रार करावी. परंतु हे 31.45 रुपये शासनाचा व्हॅट आणि एलबीटी कर आहे. जो कंपन्यांनी आधीच शासनास अदा केलाय. आता तो ग्राहकांकडून वसूल केला जात आहे.
-तुषार जगताप, विक्रीकर अधिकारी, बीपीसीएल कंपनी
कारवाई करू
दराच्या संदर्भात पुरवठा अधिकार्‍यांना कुठलेही अधिकार नाहीत. मात्र लुट होत असेल तर ग्राहकांनी तक्रार करावी. तक्रार केल्यास संबंधितांवर कारवाई करू. -महेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी