आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Online Grapes Shopping In Resignable Rate News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका क्लिकवर ऑनलाइन खरेदी करा नाशिकची द्राक्ष, \'होम डिलिव्हरी\'ची सुविधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गेल्या दोन वर्षात ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण वाढले आहे. अगदी घर खरेदीपासून ते घरातील फर्निचर, एवढेच नव्हे तर भाजीपाल्यापर्यंत सर्वकाही आता ऑनलाइन खरेदी केले जात आहे. देशातील ग्राहकांना आता घरबसल्या नाशिकमधील निर्यातक्षम द्राक्षांची चव चाखता येणार आहे. पिझ्झा, बर्गरप्रमाणेच नाशिकच्या द्राक्षांची 'होम डिलिव्हरी' मिळणार आहे. विशेष म्हणजे 'फेसबुक'वर नोंदणी करणार्‍या ग्राहकांना आकर्षक डिसकाऊंट देखील देण्यात येत आहे.

ऑनलाइन क्षेत्रात प्रामुख्याने बडे उद्योजक उतरले आहेत. मात्र, आता या क्षेत्रातील बड्या उद्योजकांची 'मक्तेदारी' संपुष्ठात आल्याचे चित्र दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील जलालपूर आणि कोणे गावातील काही शेतकर्‍यांनी 'नेट मार्केटिंग'चा नवा फंडा शोधून काढला आहे. शेतकर्‍यांनी 'bestgrapes.co.in' या नावाने वेबसाइट सुरु केली आहे. वेबसाइट डिझायनिंगपासून पॅकिंग आणि डिलिव्हरीपर्यंतची सर्व कामे शेतकरीच करत आहेत. एवढेच नव्हे तर द्राक्षांच्या मार्केटिंगसाठी सोशल मीडियाची मदत घेतली जात आहे. विशेष म्हणजे 'फेसबुक' आणि 'वॉट्सअॅप्स'च्या माध्यमातूनही ग्राहकांना द्राक्ष खरेदी करता येणार आहे. शेतकर्‍यांच्या द्राक्षाला योग्य किंमत तर मिळत आहे. यासोबत ग्राहकांनाही बाजाराच्या तुलनेने ही स्वस्त आणि घरपोच द्राक्ष मिळत आहेत.

अकाली पाऊस आणि गारपीटीमुळे बेजार झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांसाठी हा प्रयोग प्रेरणा देणारा ठरावा असाच आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, शेतकर्‍यांच्या मुलांनी सुरु केली वेबसाइट...