आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Online Shopping Make Hundred Crores Business In Nashik

आॅनलाइन शाॅपिंगपाेटी नाशकात वर्षभरात शंभर काेटींची उलाढाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एका क्लिकसरशी काेणतीही वस्तू आॅनलाइन खरेदी करण्याचा ट्रेण्ड दिवसेंदिवस नाशिकमध्ये वाढत असून, महापालिकेने अशा कंपन्यांवर एलबीटीचे जाळे विणल्यानंतर हाती आलेली माहिती अवा‌क‌् करून साेडणारी आहे. एकट्या ‘अॅमेझॉन’ कंपनीने दाेन वर्षांत १२ काेटी रुपयांची नाशिकमध्ये उलाढाल केल्याची लेखी माहिती एलबीटी विभागाला दिली असून, त्याद्वारे संबंधित कंपनीकडून जवळपास ६० लाखांचा एलबीटी मिळण्यासाठी महापालिकेने नाेटीस पाठवली आहे. अशा पद्धतीने आॅनलाइन शाॅपिंग करणा-या २४ कंपन्या असून, त्यांची वार्षिक उलाढाल जवळपास शंभर काेटींच्या घरात असेल, असा सूत्रांचा अंदाज आहे.

आैरंगाबाद महापालिकेने आॅनलाइन शाॅपिंग करणा-या कंपन्यांकडून एलबीटी वसुलीसाठी नाेटिसा पाठवल्या हाेत्या. या कंपन्यांची कार्यालये मुंबई वा िदल्लीस्थित असली तरी प्रत्यक्ष व्यवहार संबंधित शहरात हाेत हाेता. ही बाब लक्षात घेऊन नाशिक महापालिकेचे उपायुक्त हरिभाऊ फडाेळ यांनी शहरातील आॅनलाइन शापिंग करणा-या कंपन्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम अॅमेझॉन या कंपनीचे सातपूरस्थित कार्यालय आढळले त्यानंतर कंपनीला एलबीटी भरण्याची नाेटीस िदली. पुढे एलबीटी विभागाने पूर्णपणे लक्ष केंद्रित करून जवळपास २४ कंपन्यांचा शाेध घेतला. यात नापताेल, फ्लिपकार्ट अशा माेठ्या कंपन्यांचाही समावेश हाेता.

एलबीटी लागू झाल्यापासून या कंपन्यांकडून नाशिक शहरात झालेल्या खरेदी-विक्री व्यवहाराची माहिती एलबीटी विभागाने मागवली हाेती. एकट्या अॅमेझॉन कंपनीने तब्बल १२ काेटींची नाशिकमध्ये ऊलाढाल झाल्याची माहिती महापालिकेला दिली आहे. अन्य कंपन्यांनी माहिती देण्यासाठी वेळ मागून घेतली आहे. अॅमेझॉनला महापालिकेने दंडासहित ६० लाख रुपयांचा कर भरण्याची नाेटीस दिली आहे.

आॅनलाइन शाॅपिंगचा ट्रेण्ड लक्षात घेता वर्षभरात २४ कंपन्या मिळून किमान शंभर काेटींपर्यंत उलाढाल हाेत असेल त्याचा महसुलाच्यादृष्टीने विचार केला तर त्यातून निव्वळ एलबीटीच १५ काेटींपर्यंत मिळेल, असाही अंदाज व्यक्त हाेत आहे.

अशी आहे उलाढाल
> एकाचकंपनीकडून ६० लाखांच्या एलबीटीची अपेक्षा
> महापालिकेला या कंपन्यांकडून १५ कोटींपर्यंत एलबीटी मिळण्याचा अंदाज
> २४ कंपन्यांच्या नाशिकमधील उलाढालीवर आता लक्ष