आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Only 48 Hours For Water Rate,latest News, Divya Marathi

पाणीपट्टी भरण्यासाठी फक्त 48 तासांची मुदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना दुसरीकडे पाणीपट्टीची जेमतेम वर्षभरात 40 टक्केच वसुली झाल्याचे बघून आता महापालिकेने थेट नळजोडण्याच खंडित करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्याअंतर्गत 48 तासांत पाणीपट्टी न भरल्यास चार हजार 126 नळजोडण्यांचा पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे.
महापालिकेच्या उत्पन्नात एलबीटी अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्था करामुळे घट आली आहे. त्यातच घरपट्टी व पाणीपट्टीची दरवाढही फेटाळली जात असल्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत पालिकेला शोधावे लागत आहेत. हे करीत असताना मूळ उत्पन्नाच्या स्रोतांकडेही दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्याचाच परिणाम म्हणून की काय, सन 2013-14 हे आर्थिक वर्ष संपण्याची वेळ आली तरी 60 कोटी 54 लाख अपेक्षित उत्पन्नापैकी पाणीपट्टीचे जेमतेम 24 कोटी रुपये वसूल झाले आहेत. मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा अखेरचा महिना असून, एका महिन्यात 60 टक्के वसुलीचे आव्हान पालिकेपुढे उभे आहे. या पार्श्वभूमीवर 10 हजारांपुढील थकबाकी असलेल्यांचा पाणीपुरवठा खंडित करणे, मालमत्ता जप्तीचे वॉरंट काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महापालिकेच्या या मोहिमेमुळे करवसुली वेगाने होते का, याकडे आता लक्ष लागले आहे.