आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखोंची अन्नसुरक्षा पाच जणांच्या हाती, अवघे पाच अधिकारी पाहताहेत संपूर्ण शहराचे काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील सर्वच दुकाने, हॉटेल आणि मिठाईच्या दुकानांची तपासणी करण्यासाठी अन्न आैषध प्रशासनाकडे फक्त पाच अधिकारी असल्याने शहरातील अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ तपासणीच केली जात नसल्याचे समोर आले आहे.
अन्न आैषध प्रशासनाच्या वतीने शहरातील हॉटेलसह खाद्यपदार्थ उत्पादन, साठवणूक, वाहतूक विक्री होणाऱ्या ठिकाणी भेटी देऊन स्वच्छतेच्या दृष्टीने तपासणी करून नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाते. मात्र, अनेक वेळा अन्नसुरक्षा अधिकारी निरीक्षकांची अपुरी संख्या असल्यामुळे अधिकाऱ्यांनाच याचा मोठा त्रास सहन करावा लागताे.

कोणताही सण असो, नागरिक तोंड गोड करण्यासाठी, तसेच सण साजरा करण्यासाठी हॉटेल्स किंवा मिठाईच्या दुकानांतून मिठाई खरेदी करतात. मात्र, काही दुकानांतील मिठाई किंवा अन्नात भेसळ असते. कोणताही सण असल्यावर अन्न आैषध प्रशासनाच्या पथकाकडून शहरात ठिकठिकाणी तपासणी करण्यात येते.
हॉटेल तपासणीत, तसेच रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील अन्न तपासणीत कोणतीही गंभीर त्रुटी आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाईही केली जाते. शहराची लोकसंख्या सुमारे १६ लाख आहे. त्यानुसार किमान १५ अधिकारी असणे गरजेचे असताना अन्न आैषध विभागाचे कामकाज फक्त पाच सुरक्षा अधिकारी पार पाडत असल्याचे समोर आले आहे. या विभागात लवकरात लवकर निरीक्षकांची अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची भरती करण्यात यावी, अशी मागणी अधिकारीवर्गाकडून केली जात आहे.

वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर
कर्मचाऱ्यांच्या कमरतेमुळे कामकाजात अडचणी येत आहेत. त्यामुळे याबाबत वरिष्ठांना प्रस्ताव दिलेला आहे. लवकरच उपाययोजना करण्यात येतील. चंद्रकांतपवार, सहायक आयुक्त, अन्न आैषध

सिंहस्थातही पाच अधिकाऱ्यांचे पथक

सिंहस्थात येणाऱ्या लाखो भाविक साधू-महंतांना शुद्ध आणि निर्भेळ खाद्यपदार्थ मिळावेत, तसेच अनधिकृतपणे अथवा उघड्यावर विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांचा वेळीच बंदोबस्त करून, त्यापासून होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अन्न औषध प्रशासनाने अन्न तपासणीसाठी फक्त पाच सुरक्षा अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाची स्थापना केली आहे.