आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन वर्षांपासून नाशिक विमानतळ नुसतेच एअरमॅपवर; सर्व सुविधा असूनही विमानसेवा नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तब्बल ८४ कोटी रुपये खर्चून महाराष्ट्र शासनाने एचएएलच्या मदतीने ओझर येथे दोन वर्षांपूर्वी उभारलेल्या नाशिक विमानतळावरील ‘टेक ऑफ’ची प्रतीक्षा शिर्डी विमानतळ कार्यरत झाल्याने आता अधिकच वाढणार आहे. किंबहुना नजीकच्या भविष्यात नाशिक विमानतळ कार्यरत होण्याबाबत या क्षेत्रातील जाणकारांकडून साशंकता व्यक्त होत असून या विमानतळाचा पांढरा हत्ती पोसावा लागेल, अशी चिन्हे आहेत.   

नाशिक अाणि त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक पर्यटन, कुंभमेळा यासारख्या पारंपरिक पर्यटनासह देशाची वाइन कॅपिटल अाणि माेठी अाैद्याेगिक उलाढाल, मल्टिनॅशनल कंपन्यांच्या उपस्थितीमुळे नाशिकहून बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली या शहरांना हाेपिंग फ्लाइट सुरू व्हावी, अशी नाशिककरांची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून अाहे. याच अनुषंगाने विमानतळाच्या उभारणीचा निर्णय तत्कालीन काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सरकारने घेतला. ओझर येथे अत्याधुनिक विमानतळ उभारले गेले. त्यानंतर हे विमानतळ नाममात्र भाडेदराने एचएएलकडे हस्तांतरित करण्यात अाले. काही महिन्यांतच एअरमॅपवरही अाले. मात्र, असे असतानाही येथून विमानसेवा सुरू हाेऊ शकलेली नाही. त्यासाठी मुंबई व अन्य ठिकाणच्या विमानतळांवर ‘स्लॉट’ उपलब्ध नसल्याचे कारण संबंधित यंत्रणेकडून पुढे केले जाते. दरम्यान, केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी ‘उडान’ योजनेत समावेश झाल्याने नाशिकहून लवकरच ‘टेक ऑफ’ होईल ही अपेक्षा नजीकच्या शिर्डी विमानतळामुळे फोल ठरू पाहत आहे.     

 राज्य शासनाने नाशिकसाठी विमानतळ उभारले. मात्र, केंद्र व राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर या विमानतळावरून सेवा सुरू व्हावी याकरिता स्थानिक खासदार, उद्याेजक वगळता इतर काेणीही प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. यापूर्वीही दाेन कंपन्यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक- मुंबई अाणि नाशिक- पुणे अशी विमानसेवा सुरू केली. मात्र, काही कारणांनी त्यांनी सेवा बंद केली. एअर इंडियाने नाशिक-मुंबईकरिता दाेनदा वेळापत्रकही दिले. मात्र, मुंबई विमानतळावरून टेक ऑफ अाणि लॅण्डिंगकरिता स्लाॅट न मिळाल्याने सेवा सुरू हाेऊ शकली नाही. 

माेठा रन वे   
अाशिया खंडातील सर्वात माेठी धावपट्टी नाशकात आहे. २ जानेवारी २०१२ ला इमारतीच्या कामाचे भूमिपूजन झाले, ३ मार्च २०१४ ला उदघाटनही झाले. यानंतर २२ अाॅक्टाेबर २०१५ ला हे विमानतळ देशाच्या हवाई नकाशावर अाले. मात्र, अजूनही विमानसेवा सुरू हाेऊ शकलेली नाही.
बातम्या आणखी आहेत...