आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केवळ चित्रपटगृहात चित्रपट पाहावा : छगन भुजबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणेच चित्रसृष्टीला तारू शकते, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी केले. कालिदास कलामंदिर येथे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, गोरेगावची दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे भारतीय चित्रपट शताब्दीनिमित्त आयोजित चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर किशोर कदम, स्मिता तांबे, दीपक करंजीकर, मुक्ता बर्वे, नंदू माधव आदी कलाकार, गजेंद्र अहिरे, राजीव पाटील आदी दिग्दर्शक तसेच सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक आशुतोष घोरपडे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे, ए. टी. पवार, विभागीय आयुक्त रवींद्र जाधव, अपर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे आदी उपस्थित होते.

मनोरंजन क्षेत्रात दरवर्षी 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होत आहे. वर्षाला नऊ हजार कोटींची उलाढाल असलेल्या या चित्रपट उद्योगांतर्फे तब्बल 1200 चित्रपट बनवले जातात. यामुळे चित्रपट हा सा-यांसाठीच जगण्याचा अविभाज्य भाग बनल्याचे ते म्हणाले. मध्यंतरीच्या काळात नवीन चित्रपटही सहजासहजी टीव्हीवर घरबसल्या पाहायला मिळत मात्र, शासनाच्या प्रयत्नांमुळे पुन्हा एकदा चित्रपटगृहांकडे प्रेक्षक वळत असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
फाळके यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचाही त्यांनी या वेळी वेध घेतला. एक पडदा थिएटरच्या करमाफीचाही या वेळी त्यांनी उल्लेख केला. चित्रपट महामंडळाचे स्थानिक समन्वयक श्याम लोंढे यांनी ‘भारतीय चित्रपटसृष्टीत नाशिकचे योगदान’ विषयावर मनोगत व्यक्त केले. या वेळी नाशिकरांची मोठी उपस्थिती होती.