आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘थ्री-डे टुरिझम’सह पर्यटन प्राधिकरण निर्मितीचा संकल्प

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिकमधील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘नाशिक थ्री डे टुरिझम डेस्टिनेशन’ या नावाने जिल्ह्यातील सौंदर्यस्थळांचा प्रचार करण्यासह सर्व पर्यटनप्रेमींनी एकत्र येऊन नाशिक विकास पर्यटन प्राधिकरणची निर्मिती करण्याचा संकल्प गुरुवारी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात झालेल्या ‘राउंड टेबल’मध्ये करण्यात आला.

शुक्रवारच्या जागतिक पर्यटन दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलताना बहुतांश निमंत्रितांनी नाशिकला पर्यटनक्षेत्रात अनेक संधी असून, या शहरातील पर्यटनस्थळांचा अधिकाधिक प्रसार करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच, नाशिकमध्ये धार्मिक कार्य, देवदर्शनासाठी येणारा भाविक हा किमान तीन दिवस तरी नाशिकमध्ये राहून येथील पर्यटनस्थळांचा आनंद घेऊ शकेल, अशा स्वरूपातील पर्यटनाला चालना देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्यासाठी नाशिकला ‘थ्री डे टुरिझम डेस्टिनेशन’ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी नाशिकमधील सर्व ज्ञात आणि बर्‍याचशा अज्ञात पर्यटनस्थळांची ‘आयटीनरी’ अर्थात पर्यटन क्रमाची संगतवार मांडणी आणि त्यासंदर्भातील माहिती असलेली पुस्तिका उपलब्ध करून देण्याचा संकल्प या वेळी ‘तान’च्या वतीने माजी अध्यक्ष जयेश तळेगावकर यांनी जाहीर केला. त्यासाठीची सर्व माहिती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी डॉ. सुधीर संकलेचा आणि डॉ. शिरीष घन यांनी स्वीकारली.

महिनाभरात ठोस कृती

नाशिकच्या पर्यटन विकासासाठी प्रशासन प्रतिनिधी व पर्यटनप्रेमी मान्यवरांच्या सहभागावर आधारित नाशिक जिल्हा पर्यटन विकास समिती गठित करण्यासह नाशिक विकास पर्यटन प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्धार टुरिझम फॅन्स क्लबचे अध्यक्ष प्रा. उमेश पठारे यांनी व्यक्त केला. त्यादृष्टीने महिनाभरात ठोस कृती करण्याचेही त्यांनी जाहीर केले.

चर्चेतील मुद्दे

> नाशिकला पर्यटनक्षेत्रात अनेक संधी

> शहरातील पर्यटनस्थळांचा अधिक प्रसार करण्यावर भर देण्याची गरज

> नाशिकला ‘थ्री डे टुरिझम डेस्टिनेशन’ म्हणून प्रोत्साहन द्यावे

> नाशिकमधील ज्ञात-अज्ञात पर्यटनस्थळांची माहितीपुस्तिका उपलब्ध करून देण्याचा संकल्प