आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दशकांनंतर वाजणार महाविद्यालयात वाजणार निवडणुकीचा बिगुल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राजकीयकार कीर्दीची पहिली पायरी असलेल्या महाविद्यालयीन निवडणुका दोन दशकांच्या कालखंडानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशामुळे पुन्हा एकदा होणार असल्याने, आता लवकरच निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.

दरम्यान, निवडणुका घेण्यासंदर्भात विद्यार्थी संघटनांशी चर्चा केली जाईल, अशी माहिती देत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अॅक्ट १९७४ मध्ये बदल करण्याचे संकेतही दिले आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून महाविद्यालये विद्यापीठांमध्ये थेट निवडणुकांमधून स्टुडंट कौन्सिल जीएस (जनरल सेक्रेटरी) निवडला जाणार आहे.
महाविद्यालयीन निवडणुकीच्या काळात एका विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आल्याने युनिव्हर्सिटी अॅक्टमध्ये बदल करून निवडणुकांवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने महाविद्यालयांत निवडणुका घेण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय दिला होता. त्यानुसार न्यायालयाने महाविद्यालयांमध्ये थेट निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. परंतु, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अॅक्टमध्ये निवडणुकीवर बंदी घालण्यात आल्याने विद्यापीठांकडूनही त्यासाठी पुढाकार घेतला जात नव्हता. या पार्श्वभूमीवर यूजीसीने सर्व विद्यापीठांना पत्रकाद्वारे निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.

विद्यार्थीदशेत निवडणुकांना सामोरे गेले, तर राजकारणाचा पाया भक्कम होत असतो. तसेच नेतृत्व गुण संघटन कौशल्य वकिसित होत असल्याने महाविद्यालयांमध्ये निवडणुका गरजेच्या आहे. -शिवा वाघ, जीएस,बीवायके महाविद्यालय

महाविद्यालयांमध्ये निर्भय वातावरण तयार करून थेट निवडणुका व्हायला पाहिजे. निवडणुकीच्या काळात महाविद्यालयांत वाद होण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगल्या वातावरणात निवडणुका झाल्यास नेतृत्व घडविण्याची संधी उपलब्ध होईल. -अपर्णा पांडे, जीएस,सिडको महाविद्यालय

अंमलबजावणी करू
युवकांमध्येलोकशाहीचे मूल्य रुजवित, तसेच संसदीय लोकशाही प्रक्रियेची माहिती व्हावी, या उद्देशाने महाविद्यालयीन निवडणुका घेतल्या जातात. परंतु, या निवडणुकांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्याने निवडणुकीचा बेरंग झाला. त्यामुळे शासनाने निर्णय घेतल्यास मुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका घेतल्या जातील. डॉ.दिलीप धोंडगे, प्राचार्य,केटीएचएम

महाविद्यालयीन निवडणुकीमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्याने यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये अनेक चुकीच्या घटना घडल्या. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. महाविद्यालयात थेट निवडणुका घेताना, सुरक्षेला प्राधान्य देऊनच निवडणुकीची प्रक्रिया पार पडली पाहिजे. -प्रेरणा जैन, जीएस,एचपीटी महाविद्यालय