आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुले रेल्वेस्थानक करणार बंदिस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - मध्य रेल्वेच्या स्थानकांपैकी चहुबाजूने खुले असलेले एकमेव नाशिकराेड रेल्वेस्थानक सिंहस्थकाळात बॅरिकेड्स लावून बंद केले जाणार असून, देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षितेसाठी रेल्वे सुरक्षा दलाचे ७०० जवान, लाेहमार्गचे ५०० पाेलिस, तर एनसीसी, स्काउटचे ३०० छात्र असे १५०० रक्षकांची फाैज तैनात असणार अाहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी विविध साेयीसुविधा उपलब्ध केल्या असल्या तरी सुरक्षितेबाबत प्रशासन चिंतातुर अाहे. देशभरातून सुमारे तीन लाख भाविक रेल्वेने नाशिकला येण्याचा अंदाज असून, अलाहाबाद रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी झाल्याने पादचारी पुलावरील दुर्घटनेत जीवितहानी झाली हाेती. ती पुनरावृत्ती टाळण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल लाेहमार्ग पाेलिस ठाण्याने सुरक्षितेचा अाराखडा तयार केला अाहे.

सिंहस्थासाठी साेडल्या जाणाऱ्या गाड्या चाैथ्या प्लॅटफार्मवर थांबवणार असल्याने तेथील बंदाेबस्त, तसेच प्लॅटफार्मवरील भाविकांसाठी सिन्नरफाटा बाजूकडे उभारल्या जाणाऱ्या नवीन प्रवेशद्वारातून बाहेर साेडले जाणार असल्याने प्रवेशद्वार वाहनतळाजवळ चाैकीचे नियाेजन अाहे. याशिवाय नियमित गाड्या प्लॅटफार्म ते वरून जाणार असल्याने त्यांच्या सुरक्षितेचे स्वतंत्र नियाेजन केले अाहे. शहरातून परतणाऱ्यांसाठी मालधक्का येथून गाड्या साेडल्या जातील. परतणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्याने रेल्वेस्थानकाएेवजी सुभाषराेडमार्गे मालधक्का जाण्याच्या मार्गावर मालधक्क्यावर सुरक्षा चाैकी, सुरक्षारक्षक तसेच टेहळणी बुरुज उभारण्याचे नियाेजन अाहे. स्थानकावर नवीन जुन्या तीन पादचारी पुलांच्या चढण्या-उतरण्याच्या मार्गावर सुरक्षारक्षक असतील. स्थानकात आत बाहेर पडण्याच्या ठिकाणी भाविकांचे सामान तपासले जाईल.

सुरक्षा नियोजन अाढावा
सिंहस्थाच्यापार्श्वभूमीवर रेल्वेचे अपर पाेलिस महासंचालक डी. कनकरत्ने यांनी पदभार स्वीकारताच सुरक्षा नियाेजनाचा अाढावा घेतला. रेल्वेस्थानक, मालधक्का येथील संभाव्य सुरक्षा नियाेजनाची पाहणी केली. मालधक्क्यासमाेर प्रवासी थांबण्यासाठी दहा एकर जागेत प्रवासी शेड उभारले जाईल. तेथील सुरक्षेचे नियाेजन, येणाऱ्या गाड्या थांबतील ते प्लॅटफार्म मालधक्क्यावरून सुटतील तेथील नाशिकराेड सिन्नरफाटा बाजूकडील वाहनतळावरील सुरक्षा नियाेजनाचा अाढावा त्यांनी घेतला.

१४० कॅमेऱ्यांची नजर
चारप्लॅटफार्म नाशिकराेड सिन्नरफाटा बाजूकडील नवीन प्रवेशद्वारापर्यंत भाविकांच्या सुरक्षेसाठी सध्याच्या २० नवीन १२० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. स्थानकावर १२० तात्पुरते नवीन कॅमेरे लावण्यास प्रशासनाने मंजुरी दिली अाहे. कॅमेऱ्याचे कंट्राेल रूम केंद्रीय रेल्वे सुरक्षा दलाकडे असेल.