आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Open University Admission Open Still 25 September

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशास मुदत २५ सप्टेंबर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात राज्यातील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि अभ्यास केंद्रांच्या मागणीवरून येत्या २५ सप्टेंबरपर्यंत प्रथम वर्ष पदवी विनाविलंब इतर शिक्षणक्रमांसाठी विलंब शुल्कासह प्रवेश मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठाने यापूर्वी १६ जून, जुलै आणि १६ जुलै आणि ३१ ऑगस्ट २०१५ रोजी विनाविलंब मुदतवाढ दिली होती. पूर्वतयारी एमबीए प्रवेश परीक्षा दि. २१ ते २४ ऑगस्ट आणि सप्टेंबरला झालेली असल्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विनाविलंब दि. १६ ते २५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याव्यतिरिक्त उर्वरित शिक्षणक्रमांना १००/- विलंब शुल्क भरून प्रवेश घेता येतील. पूर्वतयारी एमबीए शिक्षणक्रमांच्या प्रवेश परीक्षा सप्टेंबरला झाल्याने ही मुदतवाढ केली. प्रथम वर्ष बी.ए. बी. कॉम., बी. एस्सी. आणि एम.बी.ए. शिक्षणक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने पुन्हा विलंब शुल्कासह मुदतवाढ देण्याचा निर्णय (कृषिविज्ञान विद्याशाखेचे सर्व शिक्षणक्रम, बि.लीब., एम.लीब, शालेय व्यवस्थापन आणि बी.एड., एम.ए. एम. कॉम., एम. एस्सी. वगळून) घेतला आहे.

उर्वरित सर्व शिक्षणक्रमांसाठी नियमित शुल्काची वेळ संपल्याने दि. १६ ते २५ सप्टेंबर पर्यंत रू. १००/- विलंब शुल्क भरून प्रवेश घेता येईल. दरम्यान विज्ञान तंत्रज्ञान विद्याशाखेच्या सर्व पदविका पदवी शिक्षणक्रमांसाठी मात्र ३० सप्टेंबर पर्यंत विना विलंब प्रवेश शुल्क असेल. विद्यार्थी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून घर बसल्या ऑनलाईनप्रवेश अर्ज भरू शकतात. मात्र ज्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे शक्य नाही अशांनी विद्यापीठाने निर्धारित केलेल्या सेवा केंद्रांतून अथवा सायबरकॅफेतून प्रवेश अर्ज भरता येतील.

प्रवेश मुदतीचा लाभ घ्या
अधिकमाहितीसाठी विद्यापीठाच्या ycmou.digitaluniversity.ac संकेतस्थळास भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश घेण्यासाठी ही अखेरची संधी असून विद्यापीठाने दिलेल्या वाढीव प्रवेश मुदतीचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी केले आहे.