आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा ११ मेपासून, राज्यातील ७४९ केंद्रांवर होणार परीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या परीक्षा बुधवार(दि. ११)पासून सुरू होत आहेत. महाराष्ट्रातील ७४९ परीक्षा केंद्रांवर बी.ए., बी.कॉम. अन्य शिक्षणक्रमांच्या अंतिम लेखी परीक्षा ११ मेपासून राज्यभर होत आहेत. जवळपास लाख १० हजार विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत. यावर्षी प्रथमच विविध शिक्षणक्रमांची परीक्षा प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवित असल्याने परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसणार आहे.

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा ११ ते २७ मे २०१६ दरम्यान होत आहेत. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून या प्रश्नपत्रिका ऑनलाइन पद्धतीने परीक्षेपूर्वी काही वेळ आधी पाठविण्यात येतील. जेवढे परीक्षार्थी तेवढ्याच उत्तरपुस्तिका असतील. विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या उत्तरपुस्तिकांवर परीक्षार्थींची संपूर्ण माहिती छापील असून, त्याला बारकोड असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाता त्यांना उत्तरे लिहायला सुरुवात करता येईल. बी.ए., बी.कॉम. (मराठी / इंग्रजी /उर्दू / हिंदी माध्यम), बी.ए. (ग्राहक सेवा), एम.कॉम., बी.एस्सी. एम. एल. टी., बी.एस्सी. ऑप्टोमेट्री, बी.लिब., एम.ए. शिक्षणशास्त्र, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, बी.एस्सी. हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट, बी. एस्सी. हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडीज, बी.एस्सी. इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड कॅटरिंग ऑपरेशन, बी.एस्सी. इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज अँड केटरिंग सर्व्हिसेस, सहकार व्यवस्थापन पदविका, आरोग्यमित्र, रुग्णसहायक, योगा शिक्षक, बालविकास सेविका, गांधी विचार दर्शन, बी.एस्सी. (इंडस्ट्रियल ड्रग्ज सायन्स), बी.एस्सी. (इंडस्ट्रियल सायन्स) तसेच बी.एस्सी. (ड्रग सायन्स), बी.ए. (लोकसेवा) एम. ए. (लोकसेवा), सहकार व्यवस्थापन पदविका (दुग्धव्यवसाय /बँकिंग / सहकारी / कृषी व्यवसाय), एम. कॉम., एम. ए., एम. एस्सी. (विषय संप्रेषण), बी. एड., एम. एड., बी. ए. जनसंज्ञापन वृत्तपत्रविद्या इत्यादी पदवी / पदविका प्रमाणपत्र या शिक्षणक्रमांच्या परीक्षा सुरू होत आहेत.

संकेतस्थळावर हॉल तिकीट उपलब्ध...
बी.ए., बी. कॉम.च्या परीक्षा २७ मेपर्यंत सुरू राहणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र परीक्षा केंद्रावर उपलब्ध आहे. याशिवाय http://ycmou.digitaluniversity.ac संकेतस्थळावरील ‘हॉल तिकीट’ लिंकवर ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करता येणार अाहे. काही शंका अडचण उद्भवल्यास त्यांनी प्रथम अभ्यासकेंद्राशी संपर्क साधावा, त्याठिकाणी समाधान झाल्यास विभागीय केंद्राशी संपर्क करावा गरज भासल्यास विद्यापीठ मुख्यालयातील परीक्षा विभागाशीदेखील संपर्क साधू शकता, असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...