आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्त विद्यापीठाच्या सर्व उत्तरपत्रिका हाेणार हायटेेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अॉनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली. त्या पाठाेपाठ आता सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा पद्धतीतही आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करून पुढचे पाऊल टाकले आहे. येत्या पुरवणीपासून सर्वच परीक्षांच्या सर्व उत्तरपत्रिकांच्या पहिल्या पानावर परीक्षार्थींचे नाव, आसन क्रमांक, अभ्यास केंद्र क्रमांक, विषय, दिनांक अशी सर्व आवश्यक माहिती डिजिटल नाेंदवून छापील स्वरूपात दिली जाणार अाहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वत:ची माहिती भरावी लागणार नाही. अाणि ती भरताना हाेणाऱ्या चुकाही टळतील. परीक्षा पद्धतीतील या बदलाचा फायदा राज्यातील तब्बल लाख ८४ हजार विद्यार्थ्यांना होणार आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये शैक्षणिक वर्ष २०१५ २०१६ मध्ये सर्व शिक्षणक्रमांसाठी अॉनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या पुरवणी परीक्षा येत्या २४ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत होणार आहेत. त्यापासून परीक्षा पद्धतीत अामूलाग्र बदल करण्याचा निर्णय मुक्त विद्यापीठाने घेतला असून, परीक्षा आयोजन, मूल्यमापन आणि निकाल प्रक्रिया यामध्ये अत्याधुनिक संगणकीय प्रणालींद्वारे, किमान मनुष्यबळ वापरून परीक्षेचे निकाल अचूक आणि कमीत कमी वेळेत जाहीर करण्याचे नियोजन केले आहे. अॉनलाइन प्रवेशप्रक्रिया, परीक्षा पद्धतीतील डिजिटलायझेशन, निकाल अशी अाधुनिक यंत्रणा राबविणारे हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरेल.

विद्यापीठाद्वारे यावर्षी प्रथमच ऑनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया आणि परीक्षा आयोजन प्रक्रिया राबविण्यात येत अाहे. राज्यातील लाख ८४ हजार ६२६ विद्यार्थ्यांनी विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतले आहेत. याशिवाय काही शिक्षणक्रमांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या आहेत. विद्यापीठाच्या अाठ विभागीय केंद्रांतर्गत ५६ शिक्षणक्रमांच्या होणाऱ्या या पुरवणी परीक्षेसाठी राज्यातील ५७ परीक्षा केंद्रांवर ६२ हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून पुरवणी परीक्षा देतील. परीक्षाविषयक सर्व आवश्यक सेवा आणि माहिती विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नियोजित परीक्षा केंद्राची माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी, अभ्यासकेंद्राशी संपर्क साधावा, अथवा संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी केले आहे.

मूल्यमापन अॉनस्क्रीन अन‌् अॉनलाइन...
पुरवणी परीक्षेपासून परीक्षा पद्धतीने नवे बदल लागू हाेतील. त्यात परीक्षेसाठी पुरविण्यात येणाऱ्या उत्तर पुस्तिकेवर परीक्षार्थीची परीक्षेसंदर्भातील माहिती प्रिंट करून दिली जाईल. सर्व उत्तर पुस्तिकांचे मूल्यमापन ऑनस्क्रीन, ऑनलाइन पद्धतीने होणार असून, त्यामुळे मार्कस‌्, डेटा एन्ट्रीसारखी अनेक कामे कमी हाेतील.

अचूकतेचा फायदा...
^विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आल्याने अचूकता येईल. प्रश्नपत्रिका वाटप तसेच उत्तरपुस्तिका तपासणी ही सर्व कामेही संगणकीय प्रणालींचा वापर करून होणार असल्याने पारदर्शी पद्धतीने परीक्षा पार पडतील. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. -डॉ. माणिकराव साळुंखे, कुलगुरू