आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Open University Will Give Contribution For The Education Of Students Disabled

मुक्त विद्यापीठ देणार अपंग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी योगदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अपंग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ योगदान देणार असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. माणिकराव साळुंखे यांनी केले. अपंग मुलामुलींना स्वतंत्रपणे ताठ मानेने जगता आले पाहिजे, अशी अपेक्षाही कुलगुरूंनी या वेळी व्यक्त केली.
पडसाद अपंग उपचार पुनर्वसन केंद्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कर्णबधीर तज्ज्ञांच्या परिषदेची शनिवारी सांगता झाली. या परिषदेच्या अखेरच्या सत्रात कुलगुरू डॉ. साळुंके बोलत होते. शासन, समाज वाचा उपचार शिक्षक यांच्या संयुक्त प्रयत्नांनी कर्ण विकलांगता समस्यांवर समाधान काढता येईल, असा सूर या परिषदेत व्यक्त झाला. समाजकल्याण, महिला बालविकास, शिक्षण विभाग यांनी एकत्रितपणे मुकेपणाच्या समस्येबाबत योजना राबवावी, असे निष्कर्ष मांडले गेले.
शेफाली शाह, डॉ. वर्षा भागत, डॉ. नीलम वैदेवांगी दलाल, डॉ. कल्याणी मांडके, अजीजा तैबजी, रवींद्र सपकाळ, सुरभी श्रीवास्तव, विकास चौहान यांनी आपल्या शोध निबंधांचे सादरीकरण केले. समाजकल्याण एक्सलन्स अवॉर्डने आकाश जगताप, संदीप मोरे, विद्या कदम, आकांक्षा धुरी यांना गौरविण्यात आले. वाचा उपचारतज्ज्ञ स्वाती जिरंगे, नीता धुरी, स्मिता रेडकर, विद्या कदम यांचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण वैरागकर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. सुनील सौंदणकर यांनी केले, तर संयोजक शंतनू सौंदाणकर यांनी आभार मानले.

सर्वेक्षण म्हणते...
बालकाच्या जन्मापासून वर्षभराच्या आत दोष ओळखता येतो. लहानपणीच त्यांना श्रवणयंत्र लावून बोलायला शिकविले तर ती हमखास बोलायला शिकतात. शासकीय रुग्णालयातील ५१ टक्के डॉक्टर मुकेपणाची कारणे सांगू शकतात, असे सर्वेक्षणात आढळून आले अाहे.