आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅनिमेशनमधून शिष्यवृत्ती घोटाळा, मुक्त विद्यापीठात 19 कोटींची अफरातफर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त ठरलेल्या २७ संस्थांनी ३००१ आदिवासी विद्यार्थ्यांच्या नावे सुमारे १९ काेटी रुपयांहून अधिक शिष्यवृत्तीची रक्कम लाटण्यात अाल्याचे माजी न्यायाधीश पी. के. गायकवाड समितीच्या अहवालातून उघड झाले आहे.

या सर्वच संस्था अाणि त्यातील विद्यार्थी बनावट असल्याचे अहवालात नमूद करण्यात अाले अाहे. या घोटाळ्यात समाजकल्याण आदिवासी विभागाची तब्बल १४ कोटी ५० लाखांची, तर मुक्त विद्यापीठाची कोटी ६९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचेही अहवालातून उघडकीस अाले आहे.

काही दिवसांपासून राज्यभरात प्रचंड चर्चेत आलेला समाजकल्याण विभागाचा भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शिष्यवृत्तीमध्ये १२ काेटींच्या घोटाळ्यानंतर अाता बनावट कागदपत्रे सादर करून हा अजून १९ काेटींचा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती वाटपात गैरप्रकार झाला असून, त्यात विद्यार्थ्यांच्या नावे शिक्षण संस्था आणि शिष्यवृत्ती महाविद्यालयांनीच गडप केली आहे. शिक्षण संस्था तयार करून त्याची मान्यता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून घेऊन वर्षभराच्या आत २७ संस्था तयार करून तब्बल तीन हजार विद्यार्थ्यांची बोगस कागदपत्रे तयार करून शिष्यवृत्तीचा अपहार केल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे. २०१३-२०१४ मध्ये मुक्त विद्यापीठाची मान्यता घेऊन त्या मार्फत डिप्लाेमा इन डी अॅनिमेशन कोर्स चालू करून राज्यातील नाशिक, आैरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, अकोला या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची बोगस कागदपत्रे तयार करून समाजकल्याण आदिवासी विभागाच्या शिष्यवृत्तीची उचल करण्यात आल्यानंतर चौकशीसाठी विद्यापीठाच्या वतीने माजी न्या. पी. के. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापन केली.

विशेष पथकाकडून अद्याप सूचना नाही
> मुक्त विद्यापीठाच्यामान्यताप्राप्त २७ संस्थांमधून पात्र ३००१ आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या नावे शिष्यवृत्तीची रक्कम बळकावणाऱ्या संस्थांची चौकशी केली.त्यात कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झालेले नाही. पुन्हा संपूर्ण माहिती घेऊ.
-डाॅ.दिनेश भोंडे, कुलसचिव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

कोटींचा घोटाळा
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची मान्यताप्राप्त असलेले रेड पिक्सेल या संस्थेमार्फत राज्यभरात राबविण्यात आलेल्या २डी अॅनिमेशन कोर्सचे एका विद्यार्थ्याकडून २० हजार रुपये घेऊनही शासनाकडून ४८ हजार ३०० रुपये घेण्यात आले. एका विद्यार्थ्याचे ४८ हजार ३००, तर या २७ संस्थांमध्ये असलेले ३००१ विद्यार्थ्यांचे १४ कोटी ४९ लाख हजार ३०० रुपये इतकी रक्कम समाजकल्याण विभाग आदिवासी विभागामार्फत शिष्यवृत्तीच्या नावाखाली हडप केली आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याची १५ हजार ६२५ रु. फी भरणे गरजेचे असतानाही संस्थांनी खोटे चलन, खोटे शिक्के मारून शिष्यवृत्तीच्या अर्ज वर जोडून विद्यापीठाचीही कोटी ६८ लाख ९० हजार ६२५ रुपयांची फसवणूक केल्याचे अहवालात म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...