आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरवलेल्या मुलांसाठी ‘ऑपरेशन स्माइल’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून १८ वर्षांखालील हरवलेल्या वा अपहरण झालेल्या बालकांच्या शोधासाठी ते ३१ जानेवारी या कालावधीत अॉपरेशन स्माइल अभियान राबविण्यात येत आहे.

राज्यात बालकांना पळविण्याचे प्रमाण वाढत आहे. केंद्राच्या अादेशान्वये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देशभर ही मोहीम राबविण्यात येत आहे. याअाधीच्या माेहिमेत बालकांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहाेचवण्यास यश मिळाले. पोलिस महासंचालकांच्या आदेशान्वये ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. बस रेल्वे स्थानक, भीक मागणारे बालक, कचरा वेचणारी बालके, धार्मिक स्थळ, हॉटेल, दवाखाने अादी ठिकाणी काम करणाऱ्या मुलांना ताब्यात घेऊन बालकल्याण समिती, नाशिक, चाइल्ड लाइन सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून पुनर्वसन केले जाणार आहे. असे बालक अाढळल्यास पोलिस हेल्पलाइन नंबरवर नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...