आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठवाड्यात अाेला दुष्काळ जाहीर करा, सर्वपक्षीय अामदार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तीन दिवसांपासून मराठवाड्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला असून मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यात अाेला दुष्काळ जाहीर करावा, तसेच मुख्यमंत्र्यांनी तातडीने परिसराची पाहणी करुन मदत करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोमवारी केली. अाैरंगाबाद येथे मंगळवारी हाेणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी मराठवाड्याच्या सर्वपक्षीय अामदारांसह अापण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असून त्यांच्याकडे वरील मागण्या करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये निघालेल्या माेर्चात सहभागी हाेण्यासाठी धनंजय मुंडे अाले हाेते. मराठवाड्यात झालेल्या पावसाने अाजवर १५ लाेकांचा बळी गेला अाहे, असे सांगत पावसाच्या थैमानामुळे माेठ्या प्रमाणात वित्तहानी झाली अाहे. त्यामुळे संबंधितांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली २१ प्रकरणे राज्य सरकारच्या पातळीवर प्रलंबित अाहेत. ही प्रकरणे मार्गी लागावीत, अशीही मागणी मुख्यमंत्र्यांसमाेर केली जाणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

अाैरंगाबादची बैठक राजकीय हेतूनेच
अाैरंगाबाद येथे हाेणारी मंत्रिमंडळाची बैठक ही राजकीय हेतूने प्रेरित हाेऊनच घेण्यात येत अाहे. ज्या वेळी मराठवाड्यात दुष्काळ हाेता त्याच वेळी ही बैठक घेण्याची आवश्यकता होती, असेही मुंडे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...