आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटीला विरोध: इशारा सभेसाठी जाणार दोन हजार व्यापारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘नो एलबीटी-नो ऑक्ट्रॉय’ असा इशारा सरकारला देण्यासाठी 21 फेब्रुवारी रोजी मुंबईत होणार्‍या राज्यव्यापी सभेसाठी शहरातील 37 व्यापारी संघटनांचे दोन हजार प्रतिनिधी 30 बसद्वारे जाणार आहेत. याच्या नियोजनाकरिता सोमवारी (दि. 10) पंचवटीतील पाटीदार भवन येथे दुपारी 4 वाजता सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक होणार आहे.
नाशिकमध्ये झालेल्या राज्यस्तरीय व्यापारी परिषदेत ठरल्याप्रमाणे 21 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाभर बैठका घेण्यात आल्याचे फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ र्मचंट्सचे उपाध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी सांगितले.