आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा महिने अाधीच पालिकेची एकसदस्यीय प्रभागरचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अखेरच्या घटकेपर्यंत प्रभागरचनेबाबत असलेली धाकधूक, हक्काची मते विभागली जाण्याची भीती एेनवेळी रणनीती बदलण्यासाठी होणारी इच्छुकांची धावपळ अाता थांबणार असून, राज्य निवडणूक आयोगाच्या अवर सचिवांनी महापालिकेला आदेश देऊन विद्यमान नगरसेवकांचा कालावधी संपण्यापूर्वी सहा महिने आधीच एकसदस्यीय प्रभागरचना जाहीर करण्याचे आदेश दिले अाहेत. बुधवारी (दि. ८) मुंबईत मुख्य निवडणूक अायुक्तांकडे एकूणच तयारीबाबत बैठकही बाेलावण्यात अाली अाहे.

मािर्च २०१७ मध्ये राज्यातील १० महापालिका, जल्हा परिषद २९७ पंचायत समित्यांची मुदत संपणार असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक अायाेगाने महत्त्वाचे बदल करण्यास सुरुवात केली अाहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी मुंबईत निवडणूक अायुक्तांकडे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बाेलावली अाहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला पत्र पाठवण्यात अाले असून, यात बहुसदस्यीय प्रभागरचनेसंदर्भातील अादेश रद्द करण्यात अाले असून, सन २०१४ च्या महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १८ अन्वये महापालिका अधिनियम १९४९ मधील कलम मध्ये सुधारणा करण्यात अाली अाहे. त्याअनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांच्या पाच वर्षांचा कालावधी संपण्यापूर्वी सहा महिने अाधीच एकसदस्यीय प्रभागरचनेची कारवाई पूर्ण करावी, असे अादेश दिले अाहेत. म्हणजे चार वर्षे सहा महिने कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर प्रभागरचनेत काेणतेही बदल करता येणार नाही. परिणामी, इच्छुक वा विद्यमान नगरसेवकांना वेळेत प्रभागाची माहिती उपलब्ध हाेणार असून, त्यामुळे एेनवेळी मतदारांपर्यंत पाेहोचण्याची हाेणारी धावाधाव बऱ्याचअंशी कमी हाेण्याची चिन्हे अाहेत.

पुढील वर्षी दिवाळीनंतर निवडणूक रणधुमाळी
महापालिकेच्याविद्यमान नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १४ मार्च २०१७ राेजी संपुष्टात येणार अाहे. तत्पूर्वी सहा महिने अाधी प्रभागरचना पूर्ण हाेणार असल्याने तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने निवडणूक रणधुमाळीला प्रारंभ हाेणार असून, अाॅक्टाेबर २०१६ मध्ये ही प्रक्रिया पूर्ण हाेईल. हा काळ दिवाळीचा असल्याने निवडणुकीला रंगत चढेल. सद्यस्थितीत एका प्रभागातून दाेन सदस्यांची निवड झाली असून, ६१ प्रभागांचा विचार केला तर १२२ नगरसेवक पालिकेत काम करीत अाहेत.
राज यांच्या हस्ते शुक्रवारपासून उद‌्घाटनांचा धडाका
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिककडे लक्ष केंद्रित केेले असून, त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारपासून नाशिक दाैऱ्यावर येणाऱ्या ठाकरे यांच्या उपस्थितीत भरगच्च विकासकामांचा धडाका उडणार अाहे. तीन वर्षांत झालेल्या विकासकामांच्या उद्धघाटनांचे सत्र सुरू झाले अाहे. शुक्रवारी राज ठाकरे हे नाशिकमध्ये सायंकाळी दाखल हाेतील. शनिवारी सकाळी नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या प्रभागातील घरकुल याेजनेतील सदनिकांची चावी देऊन लाभार्थ्यांना वाटप हाेईल. गटनेता अनिल मटाले यांच्या प्रभागात शाळांच्या बांधकामाचे भूमिपूजन हाेणार अाहे. सभागृहनेता सलीम शेख यांच्या प्रभागातील रस्त्याचे उद्धघाटन तसेच कामगारांसाठी पुरीभाजी केंद्राचे उद्धघाटन तसेच सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर चाेपडा लाॅन्स येथे बांधण्यात अालेल्या नवीन पुलाचे उद्धघाटनही त्यांच्या हस्ते हाेण्याची शक्यता अाहे. त्यांच्यासमवेत मनसेचे संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर हे असतील.