आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाल्यासाेबतच्या फाेटाेसेशनच्या चाैकशीचे पाेलिस अायुक्तांचे अादेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहीहंडी उत्सवाचा नारळ वाढवताना बाल्या माेरे. समवेत पाेलिस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख. - Divya Marathi
दहीहंडी उत्सवाचा नारळ वाढवताना बाल्या माेरे. समवेत पाेलिस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख.
नाशिक- पूर्ववैमनस्यातून हत्या झालेल्या सराईत गुन्हेगार निखिल मनाेहर माेरे ऊर्फ बाल्यासाेबत दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभागी झालेले म्हसरूळ पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांची पाेलिस उपअायुक्तांमार्फत चाैकशी केली जाणार असल्याचे पाेलिस अायुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले. एवढेच नव्हे तर, सर्वच पाेलिस अधिकाऱ्यांना यापुढे सार्वजनिक कार्यक्रमात जाताना अायाेजकांची पार्श्वभूमी लक्षात घेण्याबाबत अाचारसंहिता ठरवून दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

गुरुवारी रात्री अारटीअाे काॅर्नरपुढे असलेल्या कलानगर भागात सराईत गुन्हेगार बाल्याचा टाेळीयुद्धातून खून झाला. याप्रकरणी पाेलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून संशयितांचे अटकसत्रही सुरू केले. मात्र बाल्याच्या मृत्यूनंतर साेशल मीडियावर त्याच्या सार्वजनिक उपक्रमाशी संबंधित फाेटाे चर्चेत अाले. बाल्यावर खुनाचे दाेन तर अन्य गुन्हे दाखल हाेते. त्याचा भाऊ गुन्हेगारी टाेळीशी संबधित अाहे. जेथे त्याचा खून झाला त्याच परिसरात काही वर्षांपूर्वी भग्या नामक तरुणाचा बाल्याने निर्घृणपणे खून केल्याचाही अाराेप हाेता. एकुणच त्याची दहशत चर्चेत असताना त्याच्याशी संबधित साईबाबा फाउंडेशनच्या दहीहंडी कार्यक्रमात म्हसरूळ पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सहभागी झाल्याचा मुद्दा वादात सापडला हाेता. अशा पद्धतीने पाेलिसच गुन्हेगारांशी संबंधित कार्यक्रमात सहभागी हाेत असतील तर लाेकांनी दाद मागायची काेठे, असाही प्रश्न उपस्थित हाेत अाहे. 

दरम्यान, यासंदर्भातील वृत्त ‘दिव्य मराठी’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पाेलिस अायुक्त डाॅ. सिंगल यांनी गंभीर दखल घेतली. या एकूणच प्रकरणाची पाेलिस उपअायुक्तांमार्फत चाैकशी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. 

यापुढे अधिकाऱ्यांसाठीही अाचारसंहिता 
यापूर्वीअंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमच्या नातेवाइकाच्या लग्नात बडे पाेलिस अधिकारी सहभागी झाल्यामुळे टीका झाली हाेती. अाताही तसाच प्रकार घडल्यामुळे अायुक्तांना सार्वजनिक कार्यक्रमात जाताना संबंधितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासूनच सहभागी हाेण्याचे अावाहन केले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...