आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदावरीतील चेंबरच्या स्वच्छतेचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-अहिल्याबाई होळकर पूल ते टाळकुटेश्वर पुलादरम्यान अधिकार्‍यांसमवेत पाहणी करीत महापौर अँड. यतिन वाघ यांनी गोदावरीतील चेंबर तत्काळ स्वच्छ करण्याच्या सूचना केल्या. परिसरातील समस्यांचे तत्काळ निराकरण करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर महापौरांनी आढावा बैठकीबरोबरच गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याची जबाबदारी अधिकार्‍यांवर जबाबदारी सोपवली आहे. होळकर पूल ते टाळकुटेश्वरापर्यंतच्या परिसरात टाकण्यात आलेल्या भुयारी गटार वाहिन्यांच्या चेंबरमध्ये मोठय़ा प्रमाणात कचरा आणि गाळ साठल्याने त्यातून दूषित पाणी बाहेर येत असल्याचे यावेळी निदर्शनास आले. जेट मशीन व बकेट मशीनद्वारे गाळ व कचरा काढून ही समस्या तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले.

रामसेतूखाली असणारे दुर्गंधीचे साम्राज्य लक्षात घेता तेथेही नियमित स्वच्छता करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बालाजी कोट परिसरातील खालच्या बाजूच्या दोन गाळ्यांमध्ये स्त्री व पुरुषांसाठी स्वच्छतागृह आणि सुलभ शौचालय तातडीने बांधण्यात येणार असून, यशवंतराव महाराज पटांगण, ढगे महाराज मंदिर व त्यामागील परिसराची कायमस्वरूपी स्वच्छता करण्याच्या दृष्टीने लक्ष देण्यास महापौरांनी सांगितले. भुयारी गटार विभागाचे अधीक्षक अभियंता यू. बी. पवार, कार्यकारी अभियंता नितीन वंजारी, रामसिंग गांगुर्डे, आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे, उपअभियंता सचिन जाधव, आर. जी. चव्हाण, दीपक मालवाळ, संजय गोसावी, डी. टी. राठोड आदी उपस्थित होते.