आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बारावीच्या विद्यार्थ्यांना संघटनांकडून 'हेल्प'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बारावीच्याविद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांमध्ये असंख्य चुकांची प्रकरणे पुढे आल्यानंतर गोंधळलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शहरातील सर्वपक्षीय विद्यार्थी समित्यांनी एकत्रित येवून ‘हेल्पलाइन नंबर’ सुरू केला आहे. या हेल्पलाइनवर हॉल तिकिटांसंदर्भातील प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना संपर्क साधला येईल.
बारावी परीक्षेच्या हॉलतिकिटांमध्ये नावातील गोंधळ, तसेच छायाचित्रेही बदललेली असल्याची प्रकरणे समोर आल्यानंतर बुधवारी माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने हॉल तिकिटांतील चुका संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनाच दुरुस्तीचे आदेश दिले. असे असतानाही अनेक विद्यार्थ्यांना एेन अभ्यासाच्या काळात हॉल तिकिटांबाबत चिंता भेडसावते आहे. येत्या २१ तारखेपासून परीक्षा सुरू होणार असली तरीही, सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ताेंडी परीक्षाही सुरू आहेत. परीक्षेच्या हाॅलतिकिटांचे वाटप सुरू असतानाच अनेक विद्यार्थ्यांच्या हाॅल तिकिटांमध्ये चुका असल्याचे निदर्शनास आले होते. नाव-आडनावात घाेळ, काॅमर्सएेवजी आर्टस् असे शाखाबदल, मेलच्या जागी फी-मेल, आईच्या जागेवर वडिलांचे नाव, पेपरच्या उत्तराच्या भाषेत इंग्रजीएेवजी मराठी, मराठीएेवजी इंग्रजी, तसेच छायाचित्रेही बदलल्याची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे एेन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉलतिकिटांवरील चुका महाविद्यालयांनीच दुरुस्त कराव्यात, असे लेखी आदेश बुधवारी बोर्डाने सर्व महाविद्यालयांना दिले मात्र, हॉल तिकिटातील चुकांमुळे परीक्षा देता येईल किंवा नाही, प्राचार्यांकडे जायचे की बोर्डाकडे असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडला आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी शहरातील सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत विद्यार्थी ऑसमन्वय समितीच्या पदाधिका-यांनी विद्यार्थ्यांचे मदतीसाठी ९८८१२२०१११ ही हेल्पलाइन सुरू केली आहे. हॉल तिकीट किंवा बारावीच्या परीक्षेत कोणतीही अडचण आल्यास या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन समितीने केले आहे.

बारावी परीक्षेच्या हाॅलतिकिटात असंख्य चुका असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.

समितीतर्फे हेल्पलाइन
सर्वसंघटनांनी एकत्र येऊन विद्यार्थी समन्वय समिती स्थापली आहे. या समितीमार्फत विद्यार्थ्यांची मदतीसाठी हेल्पलाइन नंबर दिला आहे. भूषणकाळे, सदस्य,विद्यार्थी समन्वय समिती

दहावीचे तरी लवकर द्या ...
गेल्यावर्षी दहावीच्या हॉल तिकिटांमध्येदेखील असाच घोळ झाला होता. त्या वेळी केवळ शाळेचे ओळखपत्र दाखवून परीक्षेला बसू देण्यात आले होते. मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षा होणार आहे. यातही अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून दहावीच्या विद्यार्थ्यांना पंधरा दिवस आधीच हॉल तिकीट देण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थी समन्वय समितीने केली आहे.