आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Organisation Organise God Daptar Initiative For Headmasters

मुख्याध्यापकांसाठी संघटना राबवणार डिसेंबरमध्ये 'गोड दप्तर' उपक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शालेय विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने दप्तराचे जड ओझे हलके करण्यासाठी 'दिव्य मराठी'ने आवाहन कले आहे. या आव्हानाला प्रतिसाद देत दप्तर हलके करण्यासाठी आता मुख्याध्यापक शिक्षकांसाठी कार्यरत असणाऱ्या संघटनांनी पुढाकार घेतला असून, डिसेंबरमध्ये शहरातील सर्व शाळांतील मुख्याध्यापकांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्याचा निर्णय या संघटनांनी घेतला.

शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे हलके करण्याची जबाबदारी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक विश्वस्तांवर टाकण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना आहेत. अशी अंमलबजावणी झाल्यास मुख्याध्यापकांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो. नाशिक महानगर माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ, जिल्हा मुख्याध्यापक संघटना, खासगी प्राथमिक शिक्षक-शिक्षकेतर महासंघ यांच्या वतीने मुख्याध्यापकांसाठी डिसेंबरमध्ये कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. त्यात दप्तर हलके करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जाईल.
हलक्या दप्तरासाठी मिळणार सूचना,
>दप्तरात तीन वह्या-तीन पुस्तके अनिवार्य. शाळांमध्ये करावी शुद्ध पाण्याची व्यवस्था.
>शाळेमधील वह्या पुस्तकांसाठी रॅक, लॉकरची सुविधा. स्मार्ट बोर्ड इ-लर्निंगचा प्रयोग.
>जोड तासिकांचे सुधारित नियोजन. कमी दप्तरासाठी पालकांचेही प्रबोधन.
>अनावश्यक शालेय साहित्याची सक्ती नको.

इ-लर्निंगसाठी करणार प्रयत्न
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक शाळेत इ-लर्निंगचा प्रयोग सुरू झाल्यास सर्व दप्तर आणण्याची गरज राहाणार नाही. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होईल. इ-लर्निंगचे छोटे-छोटे प्रयोग शाळांमध्ये सुरू होण्याची गरज आहे. नंदलाल धांडे, सचिव,खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघ