आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिसांसाठी ‘गरुडझेप’ कार्यशाळेचे आयोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थकुंभमेळ्याच्या निमित्ताने शाही स्नान तसेच पर्वणीच्या कालात लाखो भाविक नाशिकनगरीत येणार असल्याचा अंदाज प्रशासनाने बांधला अाहे. याकरिता सुमारे १५००० पोलिस कार्यरत असणार आहेत. पोलिस यंत्रणेवर येणारा ताण लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीतून औद्योगिक कीर्तनकार आणि प्रसिद्ध व्यवस्थापनतज्ज्ञ संदीप भानोसे यांचे बुधवारी (दि. १२) पोलिस मुख्यालयात ‘गरुडझेप’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात अाले आहे.
या कार्यशाळेत सदा तत्परता, जागरुकता, कार्य प्रेरणा तणाव व्यवस्थापनावर ते मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, नंतर विविध पोलिस ठाण्यांमध्ये सर्व पोलिसांसाठी नि:शुल्क कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कामी त्यांना निशिकांत सूर्यवंशी यांची साथ लाभणार आहे. पाेलिस उपायुक्त विजय पाटील सहायक अायुक्त डाॅ. राजू भुजबळ यांनी कार्यशाळेचे नियोजन संयोजन केले आहे. पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन यांच्या हस्ते सकाळी १० वाजता कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.