आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Organized Workshop By Divya Marathi And Tekarel Academy

योग्य नियोजनाने स्पर्धा परीक्षेत यश, ‘दिव्य मराठी’ आणि टेकरेल अकॅडमीतर्फे कार्यशाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. त्या तुलनेत करिअरचा स्वतंत्र पर्याय म्हणून स्पर्धा परीक्षांकडे पाहिले जात नाही. एमपीएससी युपीएससी या स्पर्धा परीक्षा करिअरचा उत्तम पर्याय असून, योग्य नियोजन केल्यास त्यात हमखास यश मिळविता येते. त्यासाठी सकारात्मक राहून इतरांशी नव्हे तर स्वतःशी स्पर्धा करत सातत्यपूर्वक अभ्यास केला पाहिजे, असा सल्ला तहसीलदार योगिता कोल्हे यांनी दिला.
‘दिव्य मराठी’ टेकरेल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात "एमपीएससी स्पर्धा परीक्षा यशाची गुरुकिल्ली' विषयावर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तहसीलदार कोल्हे बोलत होत्या. कार्यक्रमाला सहायक विक्रीकर आयुक्त माहूल इंदाणी, पुण्याचे जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते, अकॅडमीचे संचालक महेश थोरवे, भूषण कदम, प्रा. शरद जाधव, संजीव बोराटे आदी उपस्थित होते. डॉ. बारहाते यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यश-अपयश येतच असते. त्यामुळे खचून जाता प्रयत्न करण्याचा सल्लाही त्यांनी या वेळी िदला. धनंजय झोंबाडे यांनी सूत्रसंचालन केले. महेश थोरवे यांनी टेकरेल अकॅडमीतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

स्मार् टतंत्रज्ञानाचाही करा वापर स्पर्धापरीक्षांची तयारी करताना खूप मेहनत घ्यावी लागते. अभ्यासाबरोबरच स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळवले पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही स्पर्धा परीक्षांत करिअर करायला हवे, सातत्यपूर्वक प्रयत्न केल्यास यश नक्की मिळेल, असा सल्ला नाशिकचे सहायक विक्रीकर आयुक्त माहूल इंदाणी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
अशी करा स्पर्धा परीक्षेची तयारी
- स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना वेळेचे योग्य नियोजन करा.
- अभ्यासाचा कंटाळा आला की, वर्तमानपत्रांचे वाचन करा.
- रीड, रिव्हाइज आणि रिकॉल या पद्धतीने अभ्यास करा.
- परीक्षेतील काठिण्य पातळीचे प्रश्न ओळखून सोडवा पेपर.
- प्राइम टाइममध्ये अवघड विषयांची तयारी करा.
- आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोरे जा.