आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी दत्तक घेतले नाही, अाता सांगा अाम्ही जगायचं कसं? हतबल असलेल्या अनाथ मुलींचा प्रश्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘भूतकाळ आठवला की आजही अंगावर काटे उभे राहतात... राहायला घर नव्हते म्हणून रेल्वेस्टेशनवरच अंथरूण पसरले... वडापाव खाऊन दिवस काढले... अंगी चिकाटी हाेती म्हणून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.. अाज मी खासगी संस्थेत काम करतेय. पण, म्हणून मी भारताची नागरिक आहे का? आम्हाला साधे मतदार ओळखपत्रही मिळू शकत नाही... कमवलेल्या पैशांची बचत करण्यासाठी बँकेचे खातेही उघडू शकत नाही,’ अशी खंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडून बाहेर पडलेल्या सुलक्षणाने व्यक्त केली. 
 
राज्यातील अनाथ मुलांच्या समस्येचे ‘सुलक्षणा’ हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणावे लागेल. शासन, स्वयंसेवी संस्था अनाथ, निराधार मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेते. पण, हा आधार असतो २१ वर्षांपर्यंतच. पण, नंतर या मुलांचे भविष्य काय? ते काय करतात? याचे उत्तर ना शासनाकडे, ना स्वयंसेवी संस्थांकडेही. कुणीही दत्तक घेतले नाही म्हणून २१ वर्षांनंतर मुली थेट रस्त्यावरच येतात. अनुदान मिळत नसल्याने स्वयंसेवी संस्था त्यांना बालगृहात ठेवत नाहीत. 
 
एकटेपणाची अधिक जाणीव 
मी अाणि माझा भाऊ अाधाराश्रमात वाढलाे. सर्टिफाइड स्कूलनंतर मला असंख्य अडचणी अाल्यात. मुख्यत: अाधारकार्डच नसल्याने प्रत्येक बाबतीत अडवणूक हाेते. मदतीलाही कुणी नसल्याने अशावेळी एकटेपणाची अधिक जाणीव हाेते- अंजली,अनाथ युवती 
 
अाता मीच काम सुरू केलेय 
माझ्या संपर्कात अशा अनेक मुली अाहेत, ज्यांना सध्या काेणाचाही अाधार नाही. त्यांनी राहायचे काेठे, काम काेठे करायचे अाणि उदरनिर्वाह कसा करायचा, हा यक्षप्रश्न अाहे. अशा मुली वा महिलांसाठी मी संघटन सुरू केले अाहे. अाता त्याच्यावरच काम सुरू अाहे- सुलक्षणा,अनाथ युवती 
 
कागदपत्रांच्या अाधारे अाधारकार्ड काढता येईल 
ज्यांना काेणीही नातेवाइक नाही अशांना अनाथ असल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. त्यावरून अाधारकार्ड वा तत्सम कागदपत्रे मिळविता येतात. परंतु, ज्यांना नातेवाइक अाहेत, त्या यापूर्वी ज्या संस्थेत दाखल हाेत्या तेथे संपर्क साधून कागदपत्रे मिळविता येतील त्या अाधारे अाधारकार्ड काढता येईल. त्यासाठी मी स्वत: प्रयत्न करेन. - देवेंद्रराऊत, जिल्हामहिला अाणि बालविकास अधिकारी 
 
पत्ताच नाही 
{अाधारकार्ड, रेशनकार्ड मिळत नाही 
{ मतदानाचा अधिकार नाही 
{ सरकारी याेजनेचा लाभ घेता येत नाही 
{ बँकेत खाते, विमा, पासपाेर्टसाठी अडचणी 
 
२१ वर्षांपर्यंतच्या मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण 
सहा वर्षांपर्यंतचा मुलगा अाणि १२ वर्षांपर्यंतच्या मुली यांना अाधाराश्रमात राहण्याची परवानगी दिली जाते. त्यानंतर ज्या संस्थांना १८ वर्षांपर्यंत मुले वा मुलींना अाधार देण्याची परवानगी अाहे तेथे संबंधितांना दाखल करण्यात येते. १८ ते २१ वयाेगटाच्या मुलींना यापूर्वी सर्टिफाइड स्कूल (शासकीय मुलींची प्रमाणित शाळा) मध्ये दाखल केले जात हाेते. परंतु, अाता या शाळेचे रूपांतर अनुरक्षणगृहात झाले अाहे. त्यात मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. नाशिकमधील अनुरक्षणगृहात सध्या २३ मुली दाखल अाहेत. 
 
 
बातम्या आणखी आहेत...