आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनाथ सागरने जुळविल्या 28 अनाथ मुलींच्या लग्नगाठी, रस्त्यावर उदरनिर्वाह करून झाला अभियंता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एक वर्षाचा असतानाच त्याच्या अाई-वडिलांची हत्या झाली... एका संस्थेत ताे वाढला. पण वयाच्या अठराव्या वर्षी सरकारी नियमाप्रमाणे त्याला संस्थेच्या बाहेर काढण्यात अाले. त्यानंतर रस्त्यावर राहून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेला सागर रेड्डी अाज तरुणांचा ‘अायकाॅन’ बनला अाहे. अर्थात त्यामुळे त्याच्या डाेक्यात अजिबातच हवा गेली नाही. परिस्थितीची जाण ठेवत ताे अाता माेठ्या झालेल्या अनाथ मुलांच्या हक्कासाठी झगडताेय. इतकेच नाही तर त्यांनी हैदराबाद येथे नुकताच २८ अनाथ मुलींचा सामुदायिक विवाह देखील लावून दिला.
 
अांतरधर्मीय विवाह केला म्हणून सागरच्या नातेवाइकांनीच त्याच्या अाई-वडिलांचा मुंबईत निर्घृण खून केला. त्यावेळी सागर अल्पवयीन हाेता. सैराट चित्रपटाच्या कथानकासारखीच ही कहाणी. अनाथ झालेल्या सागरला त्याच्या अाजी-अाजाेबांनीही सांभाळायला नकार दिला. कमालीचा हुशार असलेल्या सागरला अखेर अनाथ मुलांचे संगाेपन करणाऱ्या एका संस्थेत त्याला दाखल करण्यात अाले. मुलगा वा मुलगी सज्ञान झाल्यावर त्यांना सांभाळण्याची सरकारची जबाबदारी संपते असा नियम अाहे. या नियमाचा बळी सागरही ठरला. शिक्षण घेत असतानाच त्याला संस्थेबाहेर काढण्यात अाले. त्यावेळी खड्डे खाेदण्याचे काम करून ताे उदरनिर्वाह करे.

अनाथ मुलींचे प्रश्न तर अधिक गडद
एकटेराहून जगण्यात काय अडचणी अाहेत हे वयात अालेल्या अनाथ मुलीच सांगू शकतात. बऱ्याचवेळा त्यांच्याकडे ‘साॅफ्ट टार्गेट’ म्हणून बघितले जाते. बऱ्याचवेळा परिस्थितीसमाेर हात टेकवत त्यांना मनाविरुध्द लग्नही करावे लागते. दुर्देवाने सासरी छळ झाल्यास अापल्या भावना व्यक्त करायलाही त्यांच्याकडे माहेरची माणसे नसतात. याच हतबलतेचा फायदा बऱ्याचदा सासरच्या व्यक्तींकडून घेतला जाताे. अनाथ मुलींशी लग्न करून पुढे त्यांना वाममार्गाला लावणारी काही मंडळीही समाजात वर मान करून फिरताना दिसतात.
 
काम असेल त्यावेळी दाेन्ही वेळचे पाेट भरत असे पण काम नसल्यास त्याला उपाशीपाेटी झाेपावे लागत. अशाही परिस्थितीत त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर उच्च पदावर नाेकरी लागल्यावर त्याने माेठ्या झालेल्या अनाथ मुलांसाठी माेठा लढा उभा केला अाहे. महाराष्ट्रात नाशिकसह मुंबई, पुणे, अाैरंगाबाद, साेलापूर अाणि नागपूरमध्ये त्याने काम सुरू केले अाहेच; शिवाय कर्नाटक, बंगळुरू, हुबळी, रायपूर अादी ठिकाणीही त्याने अाता चळवळ उभारली अाहे. त्याचाच एक भाग म्हणजे हैदराबाद येथे त्याने तब्बल २८ अनाथ मुलींचे लग्न स्वखर्चाने लावून दिलेत. या मुलींसाठी स्थळ शाेधण्याची जबाबदारी त्याच्या हैदराबाद परिसरातील स्वयंसेवकांनी उचलली.
 
भिकाऱ्यांच्या रांगेत उभे राहणे, हाच टर्निंग पाॅइंट
सलगदाेन दिवस खायला अन्न मिळाल्याने ताे पुरता बेजार झाला हाेता. त्यावेळी एका मंदिरात अन्नदानाचे काम सुरू हाेते. काही भिकारी हात पसरत अन्न मागत हाेते. त्यांच्या रांगेत सागर जाऊन उभा राहिला अाणि भीक मागून अन्न घेतले. ताे दिवस सागरच्या अायुष्यासाठी टर्निंग पाॅइंट ठरला. अापल्यासारख्या अनाथांना पुन्हा भिकाऱ्यासारखे हात पसरावे लागू नये म्हणून त्याने मनाेमन ठाणले. इंजिनिअरिंग पूर्ण करत ताे एका कंपनीत काम करू लागला. त्यातून मिळणारा पैसा ताे माेठे झालेल्या अनाथ मुलांच्या उदरनिर्वाहासाठी वापरू लागला. यातून अनेकांना अायुष्याची दिशा सापडली.
 
अाम्ही भारतीय नागरिक नाही का?
सागरम्हणताे की, अाता मी सुस्थापित, सुशिक्षित आणि सुसंस्कृत जीवन जगताेय. पण, मनात आयुष्यभर चटके देणाऱ्या निखाऱ्यांची धग कधीच राखेत रूपांतरित होणारी अाहे. याच ढोंगी आणि कर्मठ समाजामुळे मी अनाथ झालो. ज्याला नाव नाही, गाव नाही, पत्ता नाही. पण, तोदेखील माणूसच आहे. शाळेत नाव टाकण्यापासून मतदार अाेळखपत्र, आधार कार्ड, रेशनिंग कार्ड हा समाजशील प्राणी असल्याचा पुरावा केवळ आई-बापाचं नाव नसल्याने नाकारला जातो. अाम्ही भारतीय नागरिक नाहीतच, अाम्ही दहशतवादी अाहाेत, अशाच प्रकारची वागणूक अाम्हाला दिली जातेय. अामचं माणूसपण नाकारणाऱ्या समाजव्यवस्थेच्या विरोधात हा लढा आहे. ‘अनाथ’ असल्याचं लेबल अगदी सरणावर जाईपर्यंत पिच्छा सोडत नाही. .

कार्याला हातभार लावा
अनाथांचेहे आभाळाएवढे दु:ख घेऊन सागर रेड्डीसारखा तरुण महाराष्ट्रातील शेकडो अनाथ मुलांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक उत्कर्षासाठी झगडत आहे. त्याच्या या सामाजिक कार्याला आपलाही हातभार लागावा. संपर्क : ९७६८११७४७७.
 
तर सागर हाेईल नाशिकचा जावई
सागरचीकहाणी एेकून कमालीची प्रभावित झालेल्या नाशिकच्या एका महिला पत्रकाराने त्याला थेट लग्नाची मागणी घातली. या मुलीच्या बाेलण्यात अापल्याला अाई-वडिलांचे प्रेम दिसले, असे सागर सांगताे. मुलीला बघण्यासाठी ताे नुकताच नाशकात येऊन गेला. हे लग्न निश्चित झाल्यास ताे नाशिकचा जावई हाेणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...