आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनाथांना मिळणार माेफत दंतव्यंगाेपचार, अॉर्थाेडेंटिक स्टडी ग्रुपचा उपक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अनाथालयातील मुलांना अाता अगदी ‘ब्रश कसा करायचा’ इथपासून दातांच्या विविध विकारांवर माेफत उपचार मिळणार अाहेत. इंडियन अॉर्थाेपेडिक साेसायटीचा एक भाग असलेल्या नाशिक अॉर्थाेडेंटिक स्टडी ग्रुपकडून ही सुविधा उपलब्ध करून दिली जात अाहे. विशेष म्हणजे, यातून २५००० रुपये खर्च असलेल्या पन्नास रुग्णांवर शस्त्रक्रियाही केल्या जाणार अाहेत.
इंडियन अॉर्थाेडेंटिक साेसायटीच्या सुवर्णमहाेत्सवी वर्षानिमित्त ‘स्माइल टाॅर्च’ देशभरात फिरविली जात अाहे. डिसेंबर २०१४ मध्ये मुंबईहून निघालेली ही टाॅर्च विविध शहरांत फिरून ते १२ अाॅक्टाेबरदरम्यान नाशिकमध्ये येत अाहे. या दिवसांत दंतविकार, दंतव्यंगाेपचार याबाबत शहरात दंतव्यंगाेपचारतज्ज्ञांकडून जनजागृती कार्यक्रमाचे अायाेजन केले अाहे. एक सामाजिक जबाबदारी म्हणून शहरातील अनाथ मुलांना हे महागडे उपचार माेफत देण्याचे नाशिक अाॅर्थाेडेंटिक स्टडी ग्रुपने निश्चित केले अाहे. अाॅक्टाेबरमध्ये हे सर्व उपचार पूर्ण करण्यात येणार असले तरी त्यासाठी अनाथालये, अनाथाश्रम येथे अशा मुलांचा शाेध घेतला जाणार अाहे. यासाठी काही संस्थांचीही मदत घेतली जाणार अाहे.

या प्रकारच्या दंतव्यंगांवर विनाशुल्क उपचार
१२ते २० या वयाेगटातील मुलांमध्ये माेठ्या प्रमाणावर अाढळणारे वाकडे दात, दातांत फटी, टाळूमध्ये छिद्र, जबड्याचे विकार यांसारख्या खर्चिक शस्त्रक्रिया उपचार माेफत करण्याचे या स्टडी ग्रुपने निश्चित केले अाहे. यासाठी इच्छुक अनाथालयांत हे सर्जन जाऊन मुलांची अगाेदर तपासणी करतील त्यातून पन्नास जणांची उपचारांसाठी निवड करतील. या प्रत्येक शस्त्रक्रियेसाठी सर्वसाधारणपणे २५ हजारांच्या अासपास खर्च येताे, तो स्टडी ग्रुपच्याच सदस्यांकडून केला जाणार अाहे.

गरजूंनी येथे करावा संपर्क
अनाथाश्रमांनीही सुविधा अापल्याकडील मुलांपर्यंत पाेहाेचविण्यासाठी सहकार्य करीत डाॅ. शीतल पटणी (९४२२२७००५१), डाॅ. दिग्विजय पाटील (९५४५४५५००७), डाॅ. नितीन गुळवे (९८२२३७३००८) यांच्याशी संपर्क साधावा, असे अावाहन स्टडी ग्रुपतर्फे करण्यात अाले अाहे.