आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काॅर्पोरेशन बँकेला एक कोटीचा गंडा, तर बँक ऑफ इंडियात ४३ लाखांचा अपहार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दुसऱ्या बँकेत गहाण असलेला मिळकतीचा बोगस सातबारा उतारा तयार करून बनावट दस्ताएेवजाद्वारे मिळकत बँकेत तारण ठेवत काॅर्पोरेशन बँकेकडून एक कोटी १२ लाखांचे कर्ज घेत बँकेची फसवणूक करण्यात आली. तर बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाने नातेवाइकांच्या बोगस खात्यांवर ४३ लाखांची रक्कम परस्पर वर्ग करून बँकेची फसवणूक आणि विश्वासघात करण्याचा प्रकार केल्याचे उघडकीस आले अाहे. या प्रकरणी पंचवटी आणि अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या प्रकरणी मनोजकुमार कुर्मी यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार संशयित लीना ताराचंद मोरे, अनिल ताराचंद मोरे, राजेश ताराचंद मोरे यांनी काॅर्पोरेशन बँकेच्या एमआयडीसी शाखेत कर्ज घेण्यासाठी अर्ज केला होता. कागदपत्रांच्या आधारे बँकेने एक कोटी १२ लाख ११ हजारांचे कर्ज मंजूर केले. कर्जाचे हप्ते थकल्यानंतर बँक सदर मिळकत ताब्यात घेण्यासाठी गेली असता मिळकत दुसऱ्याच बँकेत गहाण असल्याचे समोर आले. संशयितांनी अर्जासोबत दुसऱ्या बँकेत गहाण असलेल्या मिळकतीचे सातबारा उतारे जोडत ती मिळकत तारण ठेवत बँकेची फसवणूक केली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत बँक ऑफ इंडियाच्या इंद्रकुंड शाखेत सन २००५ ते २०१६ या कालावधीत संशयित अंकुर सत्यपाल छाबरा (रा. पुणे) हे शाखा व्यवस्थापक असताना त्यांनी या बँकेत नातेवाइकांचे बनावट खाते उघडत बँकेची ४३ लाख ८२ हजारांची रक्कम परस्पर या खात्यावर वर्ग करत फसवणूक केली. लेखापरीक्षणामध्ये अपहाराचा हा प्रकार उघडकीस आला. रमेश अमृतकर यांच्या तक्रारीनुसार पंचवटी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
बातम्या आणखी आहेत...