आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Overcome The Disease And Wining The Silver Medal

आजारावर मात करून मिळवले सिल्व्हर मेडल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ‘आकांक्षा पुढती गगनही ठेंगणे’ ही उक्ती प्रत्यक्षात आणली ती नाशिकच्या तेजस तिवारी (वय 14) या अँथलेटिक्सपटू मुलाने. अँथलेटिक्समध्ये भाग घेण्याची इच्छा असूनही मणक्याच्या विकारामुळे त्याला ते शक्य होत नव्हते. या आजारावर उपचार सुरू असल्याने या आजारातून बाहेर येण्यास दोन महिने लागणार होते. त्यामुळे स्पर्धेत भाग घेता येणार नाही, याची त्याला खंत वाटत होती. अशा परिस्थितीत त्याने उभारी धरत स्पर्धेत भाग घेतला व राष्ट्रीय स्पर्धेतील सिल्व्हर मेडलवर आपले नाव कोरले.

मणक्याच्या असह्य आजारावर उपचार करून थकलेल्या तेजसने अँक्युपंक्चरतज्ज्ञ डॉ. राज तासकर यांच्याकडे उपचार सुरू केले. स्पर्धेत भाग घेता येत नसल्याची खंत तेजसच्या मनात असल्याचे डॉ. तासकर यांच्या लक्षात आले. त्यांनी अँक्युपंक्चर उपचाराबरोबरच मानसोपचार, फिजिओथेरपी उपचारही सुरू केले. हे उपचारावर पंधरा दिवसांनी फरक जाणवू लागला. तेजसची स्पर्धेत भाग घेण्याची इच्छाही प्रबळ झाली. रांची येथे झालेल्या ज्युनिअर अँथलेटिक राष्ट्रीय व अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात त्याची निवड झाली. या निवडीचे सोनं करत त्याने रजत पदकावर आपले नाव कोरले.

उपचारामुळे स्पर्धेत भाग घेता आला
दोन महिन्यांपूर्वी डबलबारवर कसरत करताना पडल्याने मणक्यांना मार बसला. दोन महिन्यांपासून सर्व उपचार घेऊन फरक जाणवत नव्हता. अँक्युपंक्चर उपचारासोबत फिजिओथेरपी उपचार घेतल्याने 15 दिवसांत फरक जाणवला. - तेजस तिवारी

उपचार खेळाडूंसाठी फलदायी
अँक्युपंक्चर उपचाराने स्नायू आणि हाडांमध्ये बळकटी येते. नैसर्गिकरीत्या लवचिकता येत असल्याने शरीराच्या हलचाली वेगात होतात. प्रतिकारशक्ती वाढते. सातत्य ठेवल्यास हा उपचार खेळाडूंसाठी फलदायी आहे. डॉ. राज तासकर, अँक्युपंक्चरतज्ज