आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाेझर विमानतळ एअरमॅपवर येण्यास डीजीसीएची मान्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विजयादशमीच्या पूर्वसंध्येला नाशिककरांचे खऱ्या अर्थाने हवाई वाहतुकीसंदर्भातील सीमाेल्लंघन झाले अाहे. नागरी विमान वाहतूक सुरू हाेण्यासाठी नाशिकचे विमानतळ हवाई नकाशावर अंकित करण्यासाठी अावश्यक असलेली नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची (डीजीसीए) परवानगी बुधवारी मिळाली. या सुवार्तेबराेबरच नाशिकहून प्रवासी विमानसेवा सुरू हाेण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण हाेत अाहे. या विभागाच्या महासंचालकांनी अाेझर विमानतळ हवाई नकाशावर अंकित करण्याचे अादेश दिले असले, तरी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण हाेऊन अाेझर विमानतळ एअरमॅपवर येण्यास एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे अाहे.

अाेझर येथे राज्य शासनाने ८४ काेटी रुपये खर्चून नाशिक विमानतळ उभारले. ते गेल्या दीड वर्षापासून सर्व प्रकारच्या उड्डाणांसाठी सर्व सुविधांनी सज्ज अाहे. सहा महिन्यांपूर्वीच एचएएलने ते राज्य सरकारकडे हस्तांतरितही केले. या साेहळ्याच्या निमित्ताने विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या एचएएलने घेतलेल्या परिषदेतच हे विमानतळ एअरमॅपवर नसल्याची बाब निदर्शनास अाली हाेते. ही परवानगी मिळावी यासाठी एचएएल, स्थानिक उद्याेजक, खासदार हेमंत गाेडसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश अाले असून, नाशिक विमानतळ अाता हवाई नकाशावर येईल. यामुळे दिवाळीपासून किंवा त्यानंतर लगेचच या विमानतळावरून प्रवासी विमानसेवा नियमितपणे सुरू हाेण्याची शक्यताही व्यक्त केली जात अाहे.

हा हाेणार फायदा...
मुंबईत नाईट लँडिंगला जागा नसल्याने अहमदाबादला पार्किंगसाठी जाणारी विमाने नाशिकमध्ये पार्किंग करू शकतील. याच विमानातून हाॅपिंग सेवा नाशिककरांना मिळू शकेल, जी देशातील विविध शहरांना जाेडली जाऊ शकेल. याशिवाय कार्गाे सेवाही सुरू करण्यात साहाय्य हाेणार असून, त्याचा फायदा स्थानिक फलाेत्पादन, फुलाेत्पादन, भाजीपाल्यासह अाैद्याेगिक उत्पादनांच्या निर्यातीलाही हाेऊ शकेल. यातूनच शीतगृह त्यावर अाधारित व्यवसाय माेठ्या प्रमाणावर उभे राहू शकणार अाहेत.

विकासाकडे पाऊल
^ही परवानगी मिळताच अाता विमानसेवेतील शेवटचा अडसरही दूर झाला. त्यामुळे प्रवासी विमानसेवेसह नाईट लँडिंग, कार्गाे सेवा सुरू हाेतील. नाशिकच्या विकासाचा हा महत्त्वाचा टप्पा अाहे. हेमंतगाेडसे, खासदार

वेळेचीही बचत...
^डीजीसीएकडीलअडकलेल्या या परवानगीचा पाठपुरावा अाणि विमानतळ चालवायला देण्यासाठीची प्रक्रिया या एकाचवेळी राबविल्या गेल्याने अाता नाशिककरांना विमानसेवा मिळण्यास वेळ वाया जाणार नाही. मनीषकाेठारी, माजी अध्यक्ष, निमा

महासंचालकांनी जरी उपराेक्त अादेश दिले असले तरी जगभरातील एअरमॅपवर विमानतळांची माहिती अपलाेड करण्यासाठीच्या तारखांमध्ये नाेव्हेंबरच्या ११ अाणि २२ या दाेनच तारखा नजीकच्या काळात उपलब्ध अाहेत. यामुळे त्या दिवशीच नाशिक विमानतळाची माहिती हवाई नकाशावर अपलाेड हाेऊ शकेल, अशी माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.