आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओझोन संवर्धनासाठी हवे सूत्रबद्ध नियोजन- डॉ. प्रमोद हिरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पर्यावरणातीलमानवी हस्तक्षेप वाढून ओझोनचा थर सातत्याने कमी होत असल्याने, या थरातील खड्डे भरून काढता आलेले नाहीत. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. सूत्रबद्ध नियोजन केल्यास 2050 पर्यंत ओझोन थराला पडलेले खड्डे भरून निघू शकतील, असे प्रतिपादन डॉ. प्रमोद हिरे यांनी केले.
सारडा सर्कलवरील नॅशनल महाविद्यालयात आयोजित ‘ओझोन संरक्षण सप्ताह' कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. उपळेकर, भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. मच्छिंद्र मुळे, प्रा. निलोफर शेख आदी उपस्थित होते.
डॉ. हिरे पुढे म्हणाले की, कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढून पृथ्वीचे तापमान वाढत आहे. कोळशावर आधारित वीज प्रकल्पातून ५० टक्के कार्बन डायऑक्साईड वायू हवेत सोडला जात आहे. उर्वरित २५ टक्के शहरीकरणातून उर्वरित २५ टक्के वायू सिमेंट प्रकल्पातून हवेत सोडला जात आहे. वाहनांतील इंधनाद्वारेही तो हवेत मिसळत असून, यामुळे पृथ्वीच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कार्बन डायऑक्साईडचे कमी प्रमाणात हवेत सोडणारे अणुऊर्जा प्रकल्प हे ऊर्जा निर्मितीचे चांगले स्रोत ठरू शकतील. मात्र, त्यास अनेक मर्यादा आहेत. या पर्यायावर विचार होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रा. एल. व्ही. पाटील, प्रा. एजाज खाल, प्रा. मनियार शिरिन, मोहसीन खान, सोमनाथ कांगणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख फुशेर यांनी केले, तर प्रा. गणेश मुंगसे यांनी आभार मानले.