आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Paithani Weavers Distribute Id Bye Government News In Diavyamarathi

ग्राहकांची फसवणूक: पैठणी विणकरांना शासनाचे ओळखपत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला- अस्सल पैठणी उत्पादित करणाऱ्या विणकरांना वस्त्रोद्योग विभागामार्फत संरक्षण मिळणार आहे. पैठणी विणकरांना शासनामार्फत क्रेडिट कार्ड योजनेसोबत शासनाचे ओळखपत्रही मिळणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग विभागाच्या संचालिका रिचा बागला यांनी दिली.
येवल्यात झालेल्या पैठणी विणकरांचा मेळाव्यात त्या बोलत होत्या. अस्सल पैठणीच्या जागी सेमी विकणाऱ्यांचा सुळसुळाट वाढला आहे. नुकताच एक प्रकारही विणकरांच्या जागरूकतेमुळे उघडकीस आला होता. त्यामुळे विणकरांतर्फे मनोज दिवटे यांनी या मेळाव्यात नकली पैठणीच्या सुळसुळाटाला आवर घालण्याची मागणी केली.

नकली पैठणीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने भौगोलिक उपदर्शनाचा कायदा आणला आहे, त्याची अंमलबजावणी करण्याची मागणीही दिवटे यांनी केली. क्रेडिट कार्ड याेजना चांगली असली तरी स्थानिक राष्ट्रीयीकृत बँका याबाबत उदासीन असल्याचे त्यांनी सांगितले. वस्त्रोद्योग महामंडळाने येवल्यात कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी राजेंद्र वडे यांनी केली.