आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Remove Ban On Oinons, Challenge Before India

पाकने कांदा निर्यातबंदी उठवली; भारतापुढे अाव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जानेवारी महिन्यापासून पाकिस्तान सरकारने कांदा निर्यात बंद केल्याने भारतीय कांद्याची मागणी सुमारे दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढली होती. परंतु, दोन दिवसांपासून पाकिस्तान सरकारने स्थानिक निर्यातदारांना कांदा निर्यातीची परवानगी दिली आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय कांद्यासमोर स्पर्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे कांदा दरात वाढ होऊन शेतक-यांना अधिक अार्थिक लाभ झाला असता, मात्र आता ती शक्यता मावळण्याची शक्यता आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात कांदा १८०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे.

लासलगाव, पिंपळगाव, सटाणा, दिंडोरी, कळवण या बाजार समित्यांमध्ये कांदा दरात वाढ होत असल्याने शेतक-यांनी कांदा विक्रीला सुरुवात केली होती.

त्यावर केंद्रीय कृषी विभाग किरकोळ दरवाढीवर अंकुश राहावा, म्हणून किमान निर्यातमूल्य वाढविण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. परंतु, पाकिस्तानने कांदा निर्यातीला सुरुवात करून भारतीय कांद्यापुढे नवे संकट उभे केले. सध्या मलेशिया, हॉँगकाँग, सिंगापूर, श्रीलंका, बांगलादेश या देशांमध्ये भारतीय कांद्याला पसंती दिली जाते. त्यामुळे चीन आणि पाकिस्तान कांद्याच्या तुलनेत भारताच्या कांद्याचे दर प्रतिटन ४०० डॉलर आहे. परंतु, आता चीनचा कांदा गत पंधरा दिवसांपासून सुरू झाला असून, त्यांचे दर ३७० डॉलर आहे.

तसेच आता पाकिस्तानचा नवा कांदाही बाजारात येण्यास सुरुवात झाल्याने भारतीय कांद्याची मागणी घटणार आहे. परिणामी पुन्हा कांदा दरात घट होणार असल्याचे कांदा निर्यातदारांमध्ये चर्चा आहे. तसेच नाशिकचा कांदा प्रतिकिलो २० ते २२ रुपये दराने विक्री होत असून, त्यापेक्षा अधिक होऊ नये म्हणून केंद्रीय कृषी मंत्रालय निर्यातमूल्य वाढविण्याच्या मानसिकतेमध्ये आहे.

भारतावर परिणाम
पाकिस्ताननेनिर्यातीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे कांद्याच्या सरासरी दरात १५० ते २०० रुपयांनी घट झाली. त्यामुळे भारताच्या कांदा निर्यातीवर अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे. नानासाहेबपाटील, सभापती, लासलगाव समिती

निर्यातमूल्य वाढवू नये
शेतक-यांनाकांदा दरात लाभ होण्यासाठी सरकारने कोणत्याही प्रकारे निर्यातबंदी करू नये किंवा निर्यातमूल्य वाढवू नये. त्यामुळे दर घसरणीपेक्षा जागतिक स्तरावर भारतीय कांद्याची पत कमी होते. विकाससिंग, कांदा निर्यातदार