आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्ध पुकारल्याशिवाय पाकिस्तान सुधारणार नाही; नाशिकमध्ये उपक्रमांचा दिमाखात शुभारंभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यशवंत पटांगणावरील वसंत व्याख्यानमालेत ब्रिगेडियर महाजन यांच्या व्याख्यानाला मंगळवारी रसिकांचा असा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. - Divya Marathi
यशवंत पटांगणावरील वसंत व्याख्यानमालेत ब्रिगेडियर महाजन यांच्या व्याख्यानाला मंगळवारी रसिकांचा असा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.
नाशिक- भारतावर आक्रमण करणारे चीन पाकिस्तान हे दोन्ही देश अतिशय आक्रमक आहेत. सर्वप्रथम भारतीयांनी चीनच्या आर्थिक आक्रमणांना परतावून लावण्यासाठी त्यांच्या वस्तू खरेदी करण्याचा निर्धार करत बहिष्कार टाकला पाहिजे. भारतीयांनी देशप्रेम अंगीकारणे गरजेचे आहे. जेव्हा पाकिस्तानचे तीन तुकडे होतील आणि युद्ध पुकारले जाईल, तेव्हाच पाकिस्तान सुधारेल, असे प्रतिपदन ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले. 
 
यशवंतराव महाराज पटांगण येथे आयोजित नाशिक वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प मंगळवारी (दि. २) महाजन यांनी गुंफले. त्यात त्यांनी “पाक चीनचा दहशतवाद आणि सामान्य माणसासमोरील आव्हाने” या विषयावर त्यांनी नाशिककरांशी संवाद साधला. हे व्याख्यान स्व. लोकशाहीर गजाभाऊ बेणी यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित करण्यात आले होते. या वेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, भारतामध्ये बाह्य आणि अंतर्गत असे दोन दहशतवाद आहेत. भारतीय लोकांनी सर्वप्रथम नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. अगदी वाहतूक नियमांपासून ते कोणकोणत्या बाबी भारतीय अस्मितेला धक्का देत आहेत, हे तपासून काम करायला हवे. भारतीय नागरिकांनी एकत्र येऊन काम करायला हवे. जे लोक युद्ध करू नका, लोकांना मारू नका या खोट्या मानवाधिकाराचा पुरस्कार करत आहेत त्यांना सांगणे आहे की, युद्ध कसे करावे हे सांगणे त्यांचे काम नाही. कोणत्याही दहशतवादी, नक्षलवादी लोकांप्रती सहानुभूती दाखवू नका. त्यांची चर्चा करू नका. त्यांच्याविषयी त्यांचे नाव घेऊन बोलू नका. त्यांना प्रसिद्धी हवी असते. या लहान-सहान बाबी सामान्य नागरिक निश्चितच करू शकतील. सरकारे येतील आणि सरकारे जातील पण पाकिस्तान भारताला रक्तबंबाळ करत राहील. सीमेवरून होणारी नशा आणि अंमली पदार्थांची घुसखोरी हेदेखील फोफावणाऱ्या दहशतवादामागील एक मोठे कारण आहे. या बाबींवरदेखील लक्ष देणे गरजेचे आहे. मुळात भारताला युद्ध करण्याची गरज पडली तर मागे पाहू नये, हा पर्यायदेखील आता नजरेसमोर ठेवण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर मधुकर झेंडे, पां. भा. करंजकर, सुनीता बाफना, संगीता बाफना, मेघराज बाफना, श्रीकांत बेणी उपस्थित होते. यशवंत पटांगणावरील वसंत व्याख्यानमालेत ब्रिगेडियर महाजन यांच्या व्याख्यानाला मंगळवारी रसिकांचा असा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. 

सकारात्मकता देते जीवनाला नवीन दिशा:नमिता कोहोक यांचे प्रतिपादन 
नाशिकरोड- प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना करावा लागतो. यात मानसिक, शारीरिक संकटेही असतात. या संकटांमुळे व्यक्तीचे मानसिक संतुलन ढासळतो. अशा स्थितीत ज्या व्यक्तींकडे सकारात्मकता असते, ते या संकटांवर यशस्वीपणे मात करत जीवनाला नवीन दिशा देऊ शकतात, असे प्रतिपादन मिसेस इंटरनॅशनल विजेत्या नमिता कोहोक यांनी केले. 

नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ‘लिव्हिंग विथ पॉझिटिव्हिटी’ विषयावर त्या बोलत होत्या. नाशिकरोड येथील महापालिका शाळा-१२५ च्या मैदानावर सुरू झालेल्या या वसंत व्याख्यानमालेचे उद््घाटन बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांच्या हस्ते झाले. नमिता कोहोक पुढे म्हणाल्या की, सध्या तरुणांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. कॅन्सरमुळे संबंधित व्यक्तीच नव्हे तर संपूर्ण कुटुंब वेठीस धरले जाते. त्यामुळे संबंधित व्यक्तीसह कुटुंबातील व्यक्तीही नकारात्मक विचार करण्यास सुरुवात करतात. मात्र, अशा संकटाचा सकारात्मक विचारांनी सामना केला तर कॅन्सरवर निश्चितच मात करता येते. त्यासाठी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक हवा, आजार बरा करण्यासाठी केलेले नियोजन आणि त्याचा पाठपुरावा या तिन्ही बाबी महत्वपूर्ण ठरतात. 
 
यावेळी जेईई मेन परीक्षेत मुलींमधून प्रथम आलेल्या नाशिकरोडच्या वृंदा राठी हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, जेष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, उपाध्यक्ष अशोक चोरडीया, दत्तात्रय पेखळे, रावसाहेब पोटे, मनोहर कोरडे आदी उपस्थित होते. दरम्यान, मंगळवारी (दि. २) सिने नाट्यकलाकार नेहा जोशी यांनी ‘कलाकार म्हणून जगताना’ विषयावर विचार मांडले. यावेळी नाशिकरोड परिसरातील रसिक उपस्थित होते. 
 
पुढील स्लाईडवर वाचा सविस्तर बातमी...
 
बातम्या आणखी आहेत...