आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकातील पाक कैदी स्वतंत्र सेलमध्ये; कैद्याच्या हालचालीवर लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत असलेला विदेशी कैद्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. गेल्या 20 वर्षापासून दुहेरी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पाकिस्तानी कैद्यांच्या सुरक्षेवर प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. पाकिस्तानी कैदी सनाउल्लाहाच्या मृत्यूनंतर गृहमंत्रालयाने कैद्यांच्या सुरक्षेबाबत दक्षतेचे आदेश दिले आहेत.

भारतीय नागरिक सरबजित याचा पाकिस्तानातील तुरुंगात झालेल्या मृत्यूनंतर भारतातील कारागृहात असलेले पाकिस्तानी कैदी अचानक चर्चेत आले. अब्दुल रशीद ऊर्फ राजा अब्दुल गनी ऊर्फ अब्दुल रशीद अब्दुल गनी राजपूत हा पाकिस्तानी कैदी मागील 20 वर्षांपासून तर बांगलादेश, र्शीलंकासह इतर देशातील आठ विदेशी कैदी मध्यवर्ती कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यांची शिक्षा भोगत आहे. त्यांना विदेशी, पाकिस्तानी म्हणून वागणूक मिळत नसून ते सुरक्षितपणे शिक्षा व जीवन जगत आहे.

मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली तीन गुन्ह्यांत टाडा कायद्यांतर्गत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा झालेला पाकिस्तानी कैदी राजपूतच्या सुरक्षेवर प्रशासनाकडून लक्ष दिले जात आहे. त्याला अंडा सेलमधून काढून स्वंतत्र सेलमध्ये ठेवण्यात आले आहे.