आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांनी ठाेकला तळ, गरजूंना अन्नवाटप, नाशिककरांना जाेखीम पत्करण्याचेही अावाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मुसळधार पावसामुळे गाेदावरीसह उपनद्यांना अालेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करतानाच पूरग्रस्तांच्या निवाऱ्यापासून ते भाेजनापर्यंतची जबाबदारी अाटाेपून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रात्री उशिरा विश्रामगृहाकडे कूच केले. दरम्यान, जिल्ह्यात हाय अलर्ट लक्षात घेत त्यांनी तळ ठाेकला असून, बुधवारी पूरस्थिती बघून ते मुंबईला रवाना हाेणार अाहेत. दरम्यान, हाय अलर्ट लक्षात घेत नाशिककरांनी जाेखीम पत्करू नये, असे अावाहनही त्यांनी केले.

महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतल्यानंतर दुपारपासून शहरातील अनेक धाेकेदायक ठिकाणांना भेट दिली. हाेळकर पूल, गणेशवाडी, रामवाडी, मल्हारखाण येथे भेटी दिल्या. दरम्यान, नागरिकांनी पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, काळजी घ्यावी, असे आवाहन केले.

मदतीसाठी सेनादलाची तुकडी दाखल...
गाेदावरीची पूरपातळी वाढल्यास अावश्यक मदतकार्यासाठी सेना दलाच्या जवानांची मदत घेण्याचे अादेश महाजन यांनी दिले हाेते. त्यानुसार, रात्री उशिरा विश्रामगृह येथे सेनादलाची एक तुकडी दाखल झाली. गरज पडल्यास ३०० जवानांची कुमक मागवण्यात अाल्याचे महाजन यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...