आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालखेडचे पाणी द्या, अन्यथा शिवसेनेचा येवल्यात रास्ता रोको

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला - येवला तालुक्यासाठी पालखेड धरणाचे ओव्हरफ्लोचे पाणी डावा कालव्याला तीन दिवसांच्या आत न सोडल्यास शिवसेनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख झुंजार देशमुख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

तालुक्यात आतापर्यंत केवळ 104 मिलिमीटर पाऊस झाला आहे. दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे पालखेड धरणाचे ओव्हरफ्लोच्या पाण्याने येवला तालुक्यातील लहान-मोठी बंधारे भरून दिल्यास गावोगावचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
उन्हाळ्यात तालुक्यात 13 टँकरद्वारे 2८ गावांना पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, पावसाळ्यात दोन गावांची भर पडून 13 टँकरद्वारे 30 गावे आणि 13 वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. अशा परिस्थितीत पालखेड कालव्याला पाणी सोडल्यास टंचाई तीव्रता कमी होईल, असे तहसीलदार शरद मंडलिक यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख वाल्मीक गोरे, तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, संभाजी पवार, दत्ता काळे, रावसाहेब नागरे, भास्कर कोंढरे, रामनाथ जमधडे, अशोक गरुड, नितीन संसारे, राजेंद्र लंबे, आर. बी. मेंढे, राजू मेढे, प्रकाश खोकले आदींच्या स्वाक्ष-या आहेत.