आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचक येथील भाजीबाजार अवघ्या शहरासाठी आदर्श, सायखेडा मार्गावरील वाहतूक काेंडी टळली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - जेलरोड परिसरातील जुना सायखेडारोडवर भरणारा भाजीबाजार नगरसेवक अशोक सातभाई यांच्या प्रयत्नांनी उद्यानासाठी महापालिकेतर्फे आरक्षित जागेवर स्थलांतरित झाल्याने एक अादर्श उदाहरण उभे राहिले अाहे. नाशिकसह अन्य ठिकाणी असलेल्या भाजीबाजारांसाठी हा पंचक भाजीबाजार हे राेल माॅडेलच ठरणार अाहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत हाेऊन शेतकरी-ग्राहकांना माेठीच सुविधा मिळाली अाहे. प्रत्येक प्रभागात महापालिकेने अशी सोय केल्यास सुरक्षितता, सुविधा मिळून गैरसाेय दूर हाेऊ शकते.
शहरात अशोका मार्ग, काॅलेजरोड, गंगापूररोड, जेलरोड, बिटको रुग्णालय, विडी कामगारनगर, आरटीओ काॅर्नर, दिंडोरीरोड, रविवार कारंजा या परिसरात रस्त्यावरच भाजीविक्रेते भाजीपाला विक्री करतात. त्यामुळे शहरवासीयांना वाहतूक कोंडीचा नेहमी सामना करावा लागून लहान-माेठे अपघातही हाेतात. अशीच परिस्थिती काही दिवसांपूर्वी जुना सायखेडाराेडवर सैलानीबाबा ते राजराजेश्वरी मंगल कार्यालयापर्यंत होती. या रस्त्यावरील भाजीबाजारामुळे अनेकदा अपघात झाले. रहिवाशांनी सातभाई यांच्याकडे सतत तक्रारी केल्याने त्यांनी यावर मार्ग शोधत उद्यानासाठी अारक्षित भूखंडावर भाजीबाजार बसविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला भाजीपाला विक्रेत्यांनी या जागेत जाण्यास नकार दिला. मात्र, सातभाई ठाम राहिले. त्यांनी दोन आठवडे जुना सायखेडारोडवर उभे राहून रस्त्यावरील भाजीपाला विक्रीस विरोध केला आणि सुचवलेल्या जागेवरच बसण्यास सांगितले. त्यानंतर ग्राहक आणि विक्रेत्यांनाही सवय झाल्याने या ठिकाणी दररोज सायंकाळी चार वाजेपासून भाजीबाजार भरतो. याला परिसरातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सहकार्य केल्याचे चित्र आहे.

अवलंब करावा
^प्रत्येक नगर सेवकाने आपल्या परिसरात महापालिकेच्या जागेवर भाजीपाला विक्रीची व्यवस्था करून देण्याची गरज आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यताही दूर होईल. तसेच, ग्राहकांना एकाच जागी ताजा भाजीपाला खरेदीची सुविधा मिळेल. बेरोजगार शेतकऱ्यांना थेट लाभ होईल. - अशोक सातभाई, नगरसेवक,पंचक

सुरक्षितता वाढली
^ग्राहकांसाठी उत्तम सोय झाली आहे. पूर्वी रस्त्यावरील वाहनांची भीती वाटत होती. मात्र, हा बाजार बाजूला आल्याने सुरक्षित वाटत आहे. सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळत असल्याने वेळही वाचतो. - पूनम पाटील, ग्राहक

सर्वांचीच झाली साेय
^सर्वभाजीपाला विक्रेते एकाच ठिकाणी असल्याने ग्राहकांची संख्या वाढली आहे. शिवाय, भरपूर पर्याय उपलब्ध झाल्याने ग्राहक दूरवरून खरेदीसाठी येत आहे. - रवी शिंदे, भाजीपालाविक्रेता

बाजार रस्त्यापासून दूर असल्याने सुरक्षितता वाढली
^ग्राहकांसाठी उत्तम सोय झाली असून रस्त्यावर वाहनांची भीती वाटत होती. मात्र, हा बाजार रस्त्यापासून दूर असल्याने अपघात होत नाहीत. तसेच सर्व एकाच ठिकाणी मिळत असल्याने वेळही वाचतो. - पूनम पाटील, ग्राहक

अाेटे बांधून द्यावेत
^सध्या पाऊस नाही; मात्र महापालिकेने या ठिकाणी ओटे बांधून दिल्यास पावसाळ्यातही विक्रेते आणि ग्राहकांची गैरसोय होणार नाही. एकाच ठिकाणी सर्व असल्याने ग्राहकांची संख्या खूपच अाहे. - मनीषा पाटील, भाजीविक्रेत्या
बातम्या आणखी आहेत...