आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापुराचा तडाखा- नुकसानीचा पंचनामा, २५० घरांची पाहणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापुरातील नुकसानीचे पंचनामे करण्यात हाेत असलेल्या विलंबावरून टीका झाल्यानंतर अखेरीस जिल्हाधिकारी कार्यालय पालिका प्रशासनाने शुक्रवारपासून पंचनाम्यांना सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात शिवाजीवाडी भागातील २१० पंचनामे, तर पुणेरोडवरील आंबेडकरवाडी भागात ४० नुकसानीचे पंचनामे करण्यात आले.

मंगळवारी अालेल्या महापुरानंतर गाेदाकाठावरील वस्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अाहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी दहा पथके तयार केली अाहेत. मंगळवारी महापूर अाल्यानंतर त्याचे पंचनामे तातडीने होणे गरजेचे असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप पालिका शिक्षण समितीचे सभापती संजय चव्हाण यांनी केला होता. तसेच, पंचनाम्यांअभावी लाेकांना मदत मिळत नसून, तत्काळ मनपा, जिल्हाधिकारी कार्यालयाने पंचनामे करावेत, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाने पालिकेसाेबत पथके तयार करून पंचनाम्यास सुरुवात केली आहे. शहरातील शिवाजीवाडी भागातील २१० पंचनामे, तर पुणेरोडवरील आंबेडकरवाडी भागात ४० पंचनामे करण्यात आले. याचबरोबर पालिकेकडून फिरते दवाखाने तयार करून पश्चिम, पूर्व, सातपूर पंचवटी विभागाच्या प्रत्येक घरात जाऊन शुक्रवारी ५१२ जणांची तपासणी करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...